अमर घटारे
अमरावती : विदर्भात एकीकडे सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे. मात्र या वाढलेल्या तापमानाचा फटका संत्रा बागांना बसण्यास सुरवात झाली आहे. अमरावतीतील तापमान वाढीमुळे झाडावरील संत्रा गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.
राज्यात (Heat Wave) उष्णतेची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्रात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान (Amravati) अमरावती जिल्ह्यातील तापमान देखील ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. वाढत्या तापमानामुळे बहारातील लहान संत्र मोठ्या प्रमाणात गळायला सुरवात झल्याने संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूरबाजार या भागात मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. त्यावेळी सुद्धा संत्र्याची गळणं झाली होती. आता वाढत्या (Temperature) तापमानामूळे झाडावर असलेले संत्रा गळून पडत आहे, सोबतच झाडाची पानं सुद्धा सुकत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या संत्रा गळतीचे पंचनामे करून मदत द्यावी; अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.