Kharip Hangam : कृषी केंद्राची तपासणी मोहीम; बोगस बियाणं, वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

Jalna News : खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे. यामुळे बियाणे विक्रीला सुरवात झाली आहे. या दरम्यान काही विक्रेते बोगस बियाणे विक्री करत असतात. तर काही जण वाढीव दराने बियाणांची विक्री करतात.
Kharif Season
Kharif SeasonSaam tv

रामू ढाकणे 

जालना : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खत तसेच शेतीसाठी आवश्यक औषधीची वाढीव दराने विक्री होऊ नये; म्हणून जिल्हा कृषी विभागात सज्ज झाला आहे. यासाठी पथके नेमण्यात आली असून कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. 

Kharif Season
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई, आयुक्तांनी काढले आदेश; काय आहे कारण?

खरीप हंगाम (Kharip Hangam) अगदी तोंडावर आहे. यामुळे बियाणे विक्रीला सुरवात झाली आहे. या दरम्यान काही विक्रेते बोगस बियाणे विक्री करत असतात. तर काही जण वाढीव दराने बियाणांची विक्री करतात. या दृष्टीने कृषी विभागाकडून (Agriculture Department) तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. कुणीही वाढीव दराने बियाणे खत विक्री केल्यास त्या दुकानदारावर सक्त कारवाई करणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Kharif Season
Bhandara News : रोहयोच्या कामावर बोगस मजूर; रोजगार सेवकांनी लाटले शासनाचे पैसे, तुमसर तालुक्यातील प्रकार

अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडीगोद्री आणि शहागड येथील कृषी सेवा केंद्राच्या तपासणी मोहिमेला सुरुवात झाली असून पूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान यंदा खरीप हंगाम अगदी १० ते १२ दिवसावर येऊन ठेपल्याने दुकानदार बी बियाणांची, खते आणि औषधांची खरेदी सुरू करून स्टॉक करतात. नंतर वाढीव दराने (farmer) शेतकऱ्यांना विकतात. मात्र याला लगाम लावण्यासाठी कृषी विभाग आता चांगलाच ॲक्शन मोडवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com