Bhandara News : रोहयोच्या कामावर बोगस मजूर; रोजगार सेवकांनी लाटले शासनाचे पैसे, तुमसर तालुक्यातील प्रकार

Bhandara News : ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे नसल्याने ग्रामीण भागात रोजगार राहत नाही. म्हणून शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामे सुरू केली जातात
Rojgar Hami Yojana
Rojgar Hami YojanaSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथे उघळकीस आला आहे. हा प्रताप रॊजगार सेवकांनी केला असून याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना माहिती होताच खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असुन दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी केली आहे. 

Rojgar Hami Yojana
Hingoli Water Shortage : नागरिकांकडून दररोज दीडशे टँकरद्वारे पाण्याची खरेदी; हिंगोली शहरातील भीषण चित्र

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात सद्या रोजगार हमीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे नसल्याने ग्रामीण भागात रोजगार राहत नाही. म्हणून शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामे सुरू केली जातात. गावातच रोजगार उपलब्ध झाला तर नागरिकांचे स्थलांतर थांबते. मात्र तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावात पांदण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. गावातील मजूर याच कामावर जाऊ लागले. मात्र रोजगार सेवकांनी आपल्याच (Rojgar Hami Yojana) ओळखीच्या नात्यातील ११ लोकांची बोगस हजेरी लावली. हे नागरीक कामावर आले नाही. मग त्यांचे नाव हजेरी बुकवर दिसून आलें. 

Rojgar Hami Yojana
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई, आयुक्तांनी काढले आदेश; काय आहे कारण?

गावकऱ्यांनी बोगस मजुरांची हजेरी लावल्यामुळे रोजगार सेवकाची तक्रार तुमसर खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. या विषयी खंडविकास अधिकारी यांना विचारले असताना त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर याविषयी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. पण खंडविकास अधिकारी चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे योग्य चौकशी करून दोषी रोजगार सेवकाला पदमुक्त करावे; अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com