अमर घटारे
अमरावती : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय कापसावर (Cotton) देखील परिणाम झाला आहे. आता बागायत कपाशीचे बोन्ड फुटले असून वेचणीला देखील सुरवात झाली आहे. (Amravati) परंतु कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे उत्पदक शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Breaking Marathi News)
विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे कपाशी आहे. शेतकऱ्यांचे वर्षभराच गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असते. परंतु सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना लागली आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सुरवातीलाच बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
अमरावती जिल्ह्यातील निंबोरा बोडखा येथील नामदेव वैद्य या शेतकऱ्यांनी १७ एकरावरती कपाशीची लागवड केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांना कपाशीचे उत्पादन कमी होणार असल्याने चिंता सतावते आहे. दुसरीकडे सध्या स्थितीत जर बाजार भाव कपाशीचा बघितला तर ७ हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.