KDMC News: केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांचे काम बंद; पगार मिळत नसल्याने उपसले हत्यार

Kalyan News : केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांचे काम बंद; पगार मिळत नसल्याने उपसले हत्यार
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिकेतील घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांनी आजपासून (Kalyan) काम बंद आंदोलन पुकारले आहे. नियमितपणे पगार मिळत नसल्याने कामगारांनी अनेकदा महापालिका (KDMC) प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र कार्यवाही होत नव्हती. अखेर आज या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले. (Tajya Batmya)

KDMC News
Leopard Attack: लेकरासाठी आईची जीवाची बाजी; दोन हात करत बिबट्याला पांगविले

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत घनकचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना वेतन देण्यात केडीएमसीतर्फे विलंब करण्यात येतो. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे (MNS) नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी अनेकदा आंदोलन केले. मात्र प्रत्येक वेळेला आश्वासन मिळाले. पगार वेळेवर मिळत नसल्याने या कामगारांना कुटुंब चालवताना तारेवरचे कसरत करावी लागते. अखेर आजपासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या साडेसहाशे ते सातशे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. 

KDMC News
Buldhana News : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाइसाठी झाडावर बसून उपोषण

मनसेने दिला पाठिंबा 

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. महापालिकेत घनकचरा विभागात कार्यरत असलेले सुमारे साडेसहाशे ते सातशे कंत्राटी कामगाराणी काम बंद आंदोलन पुकारल्याने कल्याण डोंबिवली शहरात कचरा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. जोपर्यंत नियमितपणे पगार मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com