अक्षय गवळी
अकोला : सद्यस्थितीला मका, सोयाबीन व कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (Akola) तर दुसरीकडे तुरीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायद्याचे ठरत आहे. आजच्या स्थितीला बाजार समितीत तुरीचे भाव १० हजाराच्या वर पोहचले आहेत. (Latest Marathi News)
सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आल्याची चर्चा आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात सुरु असलेली तेजी कायम आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजारात समितीत (Bajar Samiti) तुरीच्या दरातही दरवाढीचा ट्रेंड कायम आहे. या बाजारात १० हजार ८०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे तूरीला भाव मिळतो आहे. येत्या काही दिवसांत तूरीचे दर आणखी वाढणार असून लवकरच ११ हजार रूपयांचा टप्पा गाठणार आहे. अशी शक्यता बाजार समितीतील कृषी अभ्यासकांनी वर्तविली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तूरडाळीच्या दरवाढीतही तेजी
दरम्यान या हंगामात देशातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. यामुळे सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी होत आहे. तुरीचे उत्पादन कमी असल्याने भाववाढ होत असल्याने येत्या काळात तूर डाळीचे भाव देखील गगनाला भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.