बुलढाणा : अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून मध्यरात्री स्वतःच्याच घरात गळफास घेत शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उद्धव मानवतकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या पूर्वी या शेतकऱ्याने पोलिसांना उद्देशून (Buldhana) लिहिलेल्या पत्रात अवैध सावकारांची नावे लिहिली आहेत. (Breaking Marathi News)
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उकळी येथील उद्धव मानवतकर यांनी सावकाराकडून (Money Lenders) कर्ज घेतले होते. मात्र शेतातून उत्पन्न न आल्याने कर्ज फेडण्यास उशीर झाला. दरम्यान या अवैध सावकाराने दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच आठवडाभरात व्याजासकट घेतलेले कर्ज परत करण्याची तंबी दिली होती. यामुळे शेतकरी चिंतेत होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आठवडाभरात कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून उत्तरीय तपासणीसाठी शेतकऱ्याचा मृतदेह मेहकर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्याने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात नाव असलेल्या सावकाराचा शोध सुरु आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.