उर्फी जावेद (Urfi Javed) कायम तिच्या अतरंगी स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या फॅशनचे जगभरात चर्चा पाहायला मिळते. उर्फीने बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे. ती अनेक रिॲलिटी शोमध्ये देखील झळकली आहे. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. करिअरच्या सुरूवातीच्या काळात उर्फी जावेदला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिने अनेक मुलाखतींमध्ये आपला संघर्षाचा काळा सांगितला आहे.
bollywoodlifeच्या वृत्तानुसार एका मिडिया मुलाखतीत उर्फी जावेदने तिच्यासोबत घडलेला 'कास्टिंग काउच' चा किस्सा सांगितला. एका ऑडिशनदरम्यान तिची कशी फसवणूक झाल्याचे अभिनेत्रीने उघड केले. मुलाखतीत उर्फीने सांगितल्यानुसार, अभिनेत्रीला एका दिग्दर्शकाने कामासाठी एकटीला बोलावले होते. तो माणूस उर्फीला म्हणाला, "मी तुझा प्रियकर आहे असे समज आणि तुला माझ्यासोबत इंटिमेट सीन्स करायचे आहेत..." त्यानंतर उर्फीने रुममध्ये कॅमेरा शोधला पण तिला एकही दिसला नाही. त्यावेळी ती त्या माणसाला नकार देऊ शकली नाही. उर्फीने त्या माणसासोबत इंटिमेट सीन्स शूट केले. उर्फी जावेद म्हणाली की, "मी त्या माणसाला नकार देऊ शकले नाही. मला नाही म्हणायचे होते आणि त्याच्या गालावर जोरात थप्पड मारायची होती, पण ते शक्य नव्हते. मी त्याच्यासोबत इंटिमेट सीन शूट केले होते..."
उर्फी जावेद पुढे म्हणाली, "माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या घरमालकिणीने खूप नावे ठेवली आणि वाईट बोलली. मी हार मानली नाही. आता मात्र लोकांमध्ये तेवढे धाडस राहिलेले नाही आणि ते काय म्हणतात याची मला पर्वा नाही." उर्फी जावेदने एका मुलाखतीत असेही सांगितले होते की, "तिचे फोटो एका अडल्ट साईटवर लीक झाले होते..."
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. उर्फी जावेदने 'बिग बॉस ओटीटी' गाजवले आहे. उर्फीला 'फॉलो कर लो यार' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळवून दिली. उर्फी जावेद एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे. उर्फी जावेद 'स्प्लिट्सव्हिला' मध्ये झळकली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.