Bhooth Bangla Collection : पैसाच पैसा! अक्षय कुमारचा 'भूत बंगला' थिएटरमध्ये घालतोय धुमाकूळ, १०० कोटींपासून काही पावले दूर

Akshay Kumar Bhooth Bangla Box Office Collection Day 6 : अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या 'हॉरर कॉमेडी' चित्रपटाने जगभरात किती कोटी कमावले जाणून घेऊयात.
Akshay Kumar Bhooth Bangla Box Office Day 6
Bhooth Bangla CollectionSAAM TV
Published On
Summary

'भूत बंगला' ला चित्रपट 17 एप्रिलला रिलीज झाला आहे.

'भूत बंगला' हा अक्षय कुमारचा हॉरर- कॉमेडी चित्रपट आहे.

'भूत बंगला' चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित आहे.

'धुरंधर' नंतर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'भूत बंगला' चित्रपट रिलीज होऊन आता एक आता ६ दिवस झाले आहेत. चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. 'भूत बंगला' प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच चित्रपटाने जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. या 'हॉरर कॉमेडी' चित्रपटाला प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत.

'भूत बंगला' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ६

प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूत बंगला' चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या शेवटी वीकेंडला ५८ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये प्रदर्शनाच्या आधी आयोजित करण्यात आलेल्या 'प्रिव्ह्यू शोज'च्या कमाईचाही समावेश आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, सहाव्या दिवशी देशभरातील ११,५८४ शोजमध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूत बंगला' चित्रपटाने ६.१५ कोटी रुपयांची कमाई केली. यासह, चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस'एकूण कमाई ९३.८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर दुसरीकडे भारतातील एकूण नेट कमाई ७८.९० कोटी रुपये झाली आहे.

'भूत बंगला' चित्रपटाने सहाव्या दिवशी परदेशात २ कोटी रुपयांची नेट कमाई केली, ज्यामुळे परदेशातील त्याची एकूण ग्रॉस कमाई आतापर्यंत ३३.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या आकडेवारीसह, चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १२७.३७ कोटी रुपये झाली आहे.

  • प्रिव्ह्यू शोज: ३.७५ कोटी रुपये

  • दिवस १: १२.२५ कोटी रुपये

  • दिवस २: १९ कोटी रुपये

  • दिवस ३: २३ कोटी रुपये

  • दिवस ४: ६.७५ कोटी रुपये

  • दिवस ५: ८ कोटी रुपये

  • दिवस ६: ६.१५ कोटी रुपये

  • एकूण: ७८.९० कोटी रुपये

'भूत बंगला' चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. 'भूत बंगला' चित्रपट अर्जुनच्या कथेभोवती फिरतो; ज्यामध्ये तो मंगळपूर येथील 'भयानक' वाड्यात आपल्या बहिणीचे लग्न पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. चित्रपटाच्या कथानकात १,००० वर्षे जुन्या शापाचा तपास, 'वधूसुर' नावाचा एक आसुरी भूत आणि वाड्याला होणाऱ्या अलौकिक घटनांचा समावेश आहे. 'भूत बंगला' चित्रपटात अक्षय कुमारसोबत असरानी, राजपाल यादव, जिशू सेनगुप्ता, तब्बू, परेश रावल आणि वामिका गब्बी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

Akshay Kumar Bhooth Bangla Box Office Day 6
Dhurandhar : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! बॉक्स ऑफिसवर पुन्हा येणार 'धुरंधर' चं तुफान, रणवीर सिंहच्या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com