Mrunmayee Deshpande SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची जबरदस्त केमिस्ट्री; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचे पहिलं गाणं रिलीज, पाहा VIDEO

Manache Shlok First Song Out : मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्यात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांच्यातील केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

'मना'चे श्लोक' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.

'मना'चे श्लोक' चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे मुख्य भूमिकेत आहेत.

'मना’चे श्लोक' हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

'मना’चे श्लोक' (Manache Shlok ) चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मनवा आणि श्लोकच्या जोडीलाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या धमाल टीझरमुळे प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याच उत्सुकतेत भर घालण्यासाठी चित्रपटातील पहिले गाणं प्रदर्शित झालं आहे. 'तू बोल ना'या गाण्यात मनवा आणि श्लोक यांच्या नात्यात फुलणारे प्रेम पाहायला मिळत आहे.

मनवा आणि श्लोक दोघांचे गोड क्षण या गाण्यात दिसत आहेत. 'तू बोल ना' या सुंदर गाण्याला तुषार जोशी यांचा मधुर आवाज लाभला असून गौतमी देशपांडेने या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. सिद्धार्थ आणि सौमिल यांच्या सुरेल संगीताने हे गाणं अधिकच जबरदस्त बनले आहे. या गाण्याचे चित्रीकरण हिमालयात झाल्याने त्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. यात मनवा आणि श्लोकची केमिस्ट्री पाहायला मिळत असून या दोघांचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

मृण्मयी देशपांडे म्हणते, "या चित्रपटातील हे माझे सर्वात आवडते गाणं आहे. हिमालयात हे गाणं चित्रित केल्याने हे दिसतानाही सुंदर दिसतेय आणि त्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभवही अत्यंत सुंदर होता आणि प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल. "

'मना’चे श्लोक' हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 'मना’चे श्लोक' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे हिने केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Navratri 2025 : यंदा नवरात्र १० दिवसांची, देवीचे आगमन हत्तीवर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Betting App Case: युवराज सिंहला ED ची नोटीस; 23 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Royal Enfield Meteor 350: दमदार फिचर्स अन् जबरदस्त इंजिन, रॉयल एनफील्ड 'Meteor 350' चा नवा लूक, जाणून घ्या नवीन किंमत

SCROLL FOR NEXT