12 सप्टेंबरला तीन मराठी चित्रपट रिलीज झाले आहेत.
'दशावतार' चित्रपटाने 5 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' एकमेकांना टक्कर देत आहेत.
12 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर तीन मराठी चित्रपट रिलीज झाले. ज्यात दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) यांचा 'दशावतार' (Dashavatar) , ललित प्रभाकरचा 'आरपार' आणि उमेश कामतचा 'बिन लग्नाची गोष्ट' यांचा समावेश आहे. 'दशावतार' चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आहेत. 'दशावतार' ही कोकणातील एक लोककला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'दशावतार' चित्रपटाचे बजेट 7 कोटी रुपये आहे. मात्र चार दिवसांत चित्रपटाने 5 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बजेट वसूल करण्यासाठी अजून 2 कोटींची गरज आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत चित्रपट आपले बजेट वसूल करेल असे बोले जात आहे. 'दशावतार' ने 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटांना मागे टाकले आहे.
दिवस पहिला - 58 लाख रुपये
दिवस दुसरा - 1.39 कोटी रुपये
दिवस तिसरा - 2.4 कोटी रुपये
दिवस चौथा - 1.01 कोटी रुपये
एकूण - 5.7 कोटी रुपये
'आरपार'मध्ये हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर ही नवीन जोडी झळकली आहे. 'आरपार' ही प्रेमकथा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'आरपार' चित्रपटाने चार दिवसांत 60 लाख रुपयांच्यावर कमाई केली आहे.
'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र झळकले आहेत. यात निवेदिता सराफ देखील पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार,चित्रपटाने चार दिवसांत 53 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
'दशावतार' हा मराठी चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाने सई ताम्हणकरच्या 'गुलकंद' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'गुलकंद'ने चार दिवसांत 1.79 कोटी कमावले होते. तर नेट कलेक्शन 7.34 कोटी रुपये आणि ग्रॉस कलेक्शन 8.66 कोटी रुपये झाले. 'दशावतार' ची अशीच यशस्वी घोडदौड पुढे ही चालत राहीली तर नक्कीच बॉलिवूडच्या मोठा चित्रपटांना मागे टाकेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.