- एकीकडे कॉंग्रेसकडून वडेट्टीवार सुद्धा आंदोलनाचा तयारीत असताना, आता समता परिषदे मेळावा घेता विदर्भात तयारी करत असल्याचं बोलल जात आहे..
- ओबीसी नेते छगन भुजबळ करणार मार्गदर्शन, ओबीसी बहुजनांना आवाहन
- महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना आणि बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे.
- महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
- या मेळाव्यात ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी होणार बैठक...
- या मेळाव्यासाठी ओबीसी बहुजनांनी मोठ्या संखेने नागपूरला उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विशाल हजारे यांनी केले...
माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनर वरून शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो गायब...
काही महिन्यापूर्वीच प्रीती बंड यांनी केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
तर ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी देखील केला होता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश..
प्रीती बंड यांचा फोटो गायब असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण..
मावळ तालुक्यातील खरीप हंगामातील महत्वाचे पीक म्हणून भातपिकांची ओळख आहे. सध्या मावळ तालुक्यात भातपिकावर मोठ्याप्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पवनमावळ भागात भात पिकावर करपा रोगाचे प्रमाण जास्त आहे. करपा रोगावर उपाययोजना करण्यासाठी मावळ कृषि विभागाने गावोगावी मोहीम राबवली आहे. धामणे येथे कृषि अधिकारी विकास गोसावी व अश्विनी खंडागळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपा करपा रोगाची पाहणी केली. करपा रोगावर करावयाच्या औषध फवारणी बाबत कृषि विभागामार्फत गावोगावी जाऊन आणि व्हाट्स अँप, वार्ताफलक, बैठक घेऊन कृषि अधिकारी करपा रोगाबाबत उपाययोजना बाबत प्रचार प्रसिद्धी करत आहेत
विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव, नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
- सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचे चित्र
- एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकरी आत्महत्या, तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
- गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधी वितरित
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या दोन दिवसापासून पाऊस होतो आहे. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, तर औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथे ओढ्याला पाणी आल्याने लातूरच्या औसा येथून धाराशिवच्या तेर कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तर पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिलाय
बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावात तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याच्या जनावरांसाठी साठवलेली कडब्याची गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना वानटाकळी गावात घडली.
शेतीत पिकलेल्या कडब्याची मोठी गंजी शेतकऱ्याने मेहनतीने गोळा करून ठेवली होती. पण अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने ही गंजी पूर्णपणे वेढली आणि काही क्षणात ती पाण्यासोबत वाहून गेली. शेतकरी हतबल होऊन आपलं नुकसान डोळ्यासमोर होताना पाहत राहिला. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानंतर आज सकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली. या धुक्याचा परिणाम खरिपातील सोयाबीन,भाजीपाला या पिकांवर होण्याची शक्यता आहे. धुक्यांमुळे पालेभाज्यांनाही याचा फटका बसणार असून, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता धुक्याचे नवे संकट उभे राहिले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटीजन्य पाऊस झाला असून जिल्ह्यातील सर्व तलाव हे धोक्याच्या पातळीच्या बाहेर गेले असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे सर्व रस्ते व राष्ट्रीय महामार्ग बंद झाले असून सर्वच गावांचा सध्यातरी संपर्क तुटला आहे या पार्श्वभूमी वरती आता जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी त्याचबरोबर इंग्लिश स्कूल यांना आज सुट्टी देण्यात आली आहे हा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला असून सर्व शाळांना आज सुट्टी असणार आहेत बरोबर नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत संपर्क साधावा असेही आव्हान त्यांनी केले आहे.
:राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.आज तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करुन ते आढावा घेणार आहेत. तर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शिवसेना पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री उपस्थिती लावणार आहेत या विविध कार्यक्रम सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.
शिरूर तालुक्यात गेल्या रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कांदा लागवडीवर या पावसाचा विशेषतः मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले असून खर्चिक लागवड कोसळण्याची वेळ आली आहे. शेतकरी वर्गात चिंता व हतबलता निर्माण झाली आहे.
शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला मागणी केली आहे की, जिथे जिथे पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व भागांचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी.
अमरावती जिल्हा सह विदर्भाच आराग्य दैवत श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी या अमरावती शहराच्या ग्रामदैवत असून दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. श्री एकविरा देवी मंदिर संस्थांच्यावतीनं मंदिरातील देवीचे सर्व चांदीचे आभूषण आणि वस्तूंची खास सफाई केली जात आहे. शहरातील सुवर्णकार बांधवांच्या हातून सुरू असणाऱ्या या सफाईमुळं देवीच्या चांदीच्या आभूषणांना नवी झळझळाळी येत आहे. श्री एकविरा देवी मंदिरात देवीच्या आभूषणांसह सर्व चांदीच्या वस्तूंची स्वच्छता शहरातील सुवर्कार सेवा म्हणून करून देतात. साठ वर्षांपासून सुवर्णकार बांधव नवरात्रीच्या पर्वावर श्री एकविरा देवी मंदिरातील चांदीचे दागिन स्वच्छ करून देतात.
जालना शहरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जालना शहरालगत असलेल्या चौधरी नगर परिसरातील जालना - मंठा महामार्गाला अक्षरशा तलावाचं स्वरूप आलं असून जालना मंठा महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झालेली आहे. जालना शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल आहे तर अनेक चार चाकी वाहन देखील वाहून गेल्याची माहिती आहे.
लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण आणि पाणी प्रकल्प 100% भरले आहेत , लातूर ग्रामीण साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा तावरजा प्रकल्प देखील 100% क्षमतेने तुडुंब भरला आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे जवळपास 400 एकर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.. माजी आमदार धीरज देशमुख यांनी साधारण 47 कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे नूतनीकरण केले आहे.दरम्यान प्रकल्प पहिल्यांदाच लवकर भरल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत, जलपूजन केले आहे. यावेळी माजी आमदार धीरज देशमुख हे देखील उपस्थित होते.
जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. या पावसामुळे शहरातील मंठा चौफुली परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचा स्वरूप आल आहे. मंठा चौफुली परिसरातील रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत आहे.
तुळजापुरातुन तुळजाभवानी मातेची महाआरती करुन मराठवाडा स्वाभिमान जागर याञेचा शुभारंभ करण्यात आलाय,जातीत जातीत भांडत बसण्यापेक्षा प्रत्येक तरुणाच्या हाताला काम,शेतकऱ्यांना पाणी,तरुणांना गावात काम मिळेल त्यांना गाव सोडण्याची वेळ येवु नये यासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मराठवाडा स्वाभिमान जागर याञेचे प्रमुख नामदेवराव पाटील यांच्या वतीने ही याञा काढण्यात आली आहे.लातुर बीड जिल्ह्यातुन ही याञा धाराशिव जिल्ह्यात आली होती.मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने एकरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,कृषी कर्ज माफ करावे,दल महीन्याला मराठवाड्यात मंञी मंडळाची बैठक घ्यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या याञेला कॉग्रेसचे वतीने पाठिंबा देण्यात आला.
जालना शहरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका सीना नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये एक चार चाकी वाहन वाहून जाताना पुलाच्या कठड्याला अडकल आहे. तर बस स्टॅन्ड परिसरातून चारचाकी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे..
धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसाने जोरदार तडाखा दिला सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.पावसामुळे शेती शिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे काढणीस आलेले सोयाबीन व अन्य पिके देखील पाण्याखाली गेल्याने हजारो हेक्टर पिकांना तडाका बसला आहे. हातातून आलेला घास,पावसाने हिरावल्याने बळीराजा देखील हतबल झाला आहे.या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात 51 घराची पडझड देखील झाली आहे.जिल्ह्यात सलग तीन दिवस विविध भागात जोरदार पाऊस कोसळला यामध्ये मुरूम उमरगा तालुक्यातील 22 घरांची पडझड झाली आहे तर धाराशिव तालुक्यातील 28 घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.कळंब तालुक्यातील देखील एका घराची पडझड झाली आहे.नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून आता केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.