Royal Enfield Meteor 350: दमदार फिचर्स अन् जबरदस्त इंजिन, रॉयल एनफील्ड 'Meteor 350' चा नवा लूक, जाणून घ्या नवीन किंमत

Royal Enfield Meteor 350 Features And Price: रॉयल एनफील्डने नवीन Meteor 350 क्रूझर बाईक आकर्षक डिझाईनसह लाँच केली आहे.
Royal Enfield Meteor 350
Royal Enfield Meteor 350Saam Tv
Published On

रॉयल एनफील्डची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आता रॉयल एनफील्डने क्रूझर बाईक 'Meteor 350'नवीन लूकमध्ये लाँच केली आहे. या बाईकची सुरूवातीची किंमत 1,95,762 रूपये ठेवण्यात आली आहे.

Royal Enfield Meteor 350
Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

रॉयल एनफील्डने क्रूझर बाईकचे नवीन मॉडेल केवळ डिझाइन आणि वैशिष्ट्ये याबाबतीत अपडेट केलेले नाही तर रायडिंग अनुभव देखील खास असणार आहे. नवीन अपटेड डिझाइन आणि फिचर्ससह कंपनीने बाईकला आधुनिक आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

रॉयल एनफील्डने क्रूझर 'Meteor 350' बाईक चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

व्हेरिएंट रंग किंमत

फायरबॉल फायरबॉल ऑरेंज आणि फायरबॉल ग्रे 1,95,762 रूपये

स्टेलर स्टेलर मैट ग्रे आणि स्टेलर ब्लू 2,03,419 रूपये

ऑरोरा ऑरोरा रेट्रो ग्रीन आणि ऑरोरा रेड 2,06,290 रूपये

सुपरनोवा सुपरनोवा ब्लॅक 2,15,883 रूपये

Royal Enfield Meteor 350
UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम

रॉयल एनफील्ड क्रूझर बाईक 'Meteor 350' नवीन अपडेट

नवीन डिझाइनसोबत रॉयल एनफील्डने क्रूझर 'Meteor 350' बाईकमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत. 349 cc क्षमतेचा सिंगल- सिलेंडर, एअर - ऑइल कूल्ड इंजिन दिले आहे. जे 20.2 bhp पॉवर आणि 27 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड टान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. इंजिन स्मूथ पॉवर डिलिव्हरी आणि दर्जेदार टॉर्कसाठी ओळखले जाते. रॉयल एनफील्डने क्रूझर 'मीटिओर 350'ही बाईक विशेषत: टूरिस्ट रायडर्ससाठी डिझाइन केली आहे.या सर्व व्हेरिएंट्समध्ये आता स्टँडर्ड म्हणून एलईडी हेडलॅम्प, USB चार्जिंग पोर्ट आणि असिस्ट- अँड- स्लिप क्लच दिले आहेत. सीट एर्गोनॉमिक असल्याने रायडिंगसाठी आरामदायी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com