तिचं म्हणणं मध्येच न तोडता ऐका. कधी कधी सल्ल्यापेक्षा समजून घेणारा पार्टनर जास्त गरजेचा असतो.
फोन बाजूला ठेवा आणि तिच्यासोबत निवांत वेळ घालवा. तुमचं पूर्ण लक्ष मिळणं हीदेखील खास ट्रीटमेंट आहे.
“आज तू खूप सुंदर दिसतेस” किंवा “तुझ्यावर हे छान दिसतंय” अशी मनापासून केलेल कौतुक मूड बदलू शकते.
तिला आवडणारा चित्रपट पाहा, संगीत ऐका किंवा बाहेर फेरफटका मारा. त्या क्षणी तिच्या आवडीला प्राधान्य द्या.
फुलं, चॉकलेट किंवा हाताने लिहिलेली छोटी चिठ्ठी द्या. किंमत महत्त्वाची नाही, तर त्यामागची भावना महत्त्वाची असते.
प्रेम म्हणजे सतत जवळ राहणं नाही. तिला थोडा वेळ एकटीला हवा असेल, तर तोही आदराने द्या.
मूड स्विंग्सच्या काळात समस्या लगेच सोडवण्यापेक्षा साथ देणं महत्त्वाचं. तुमची समजूतदार साथच खरी ‘प्रिन्सेस ट्रीटमेंट’ आहे.