Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये खासगी बस जळून खाक, ३५ प्रवाशी सुखरूप

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात गणेशोत्सव, मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, कृषीमंत्र्यांचा दुष्काळ दौरा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

नागपूरमध्ये खासगी बस जळून खाक

- बुटीबोरीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग, जाम वेळीच लक्षात आल्यान जीवित हानी नाही, मात्र बस जळून खाक, बसमध्ये असलेले 35 प्रवासी सुखरूप

- चंद्रपूर-बुटीबोरी मार्गावरील बोरखेडी रेल्वे परिसरातील घटना, घटनेनंतर वाहतुकीचा झाला होता खोळंबा..

पालकमंत्री दत्तात्रय भरणे वाशिमच्या दौऱ्यावर

राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते दिवसभर मालेगाव,वाशिम, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील गावांना भेट देऊन पिक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

यात दुपारी २ वाजता झोडगा, ता. मालेगाव, दुपारी २.३० वाजता सुपखेला, ता. वाशिम , दुपारी ३ वाजता वरुड बुद्रुक, ता. मंगरूळपीर

त्यानंतर सायंकाळी ३.४५ वाजता कुपटा, ता. मानोरा आणि सायंकाळी ४.३० वाजता खेरडा, ता. कारंजा (लाड) येथे पिक परिस्थितीची पाहणी करून सायंकाळी ५ वाजता कारंजा (लाड) येथून अकोला

पुणे अग्निशमन दलाकडून होस्टेल व पीजीची तपासणी करत कारवाई

देशभरातील विविध आगीच्या दुर्घटना तसेच अलिकडेच दिल्ली, मुंबई, अमरावती याठिकाणी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टिने रुग्णालये, पीजी, क्लासेस यांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांना देताच अग्निसुरक्षाविषयक पाहणी सुरु केली आहे. या आदेशानुसार अग्निशमन प्रमुखांनी पीजी होस्टेल अग्निसुरक्षाविषयक यंञणेची पाहणी करण्यास सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव

पुणे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीनिमित्‍त यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. तर, ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, ज्येष्ठ नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष! ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

सातासमुद्रापार टेक्सासच्या भूमीत ढोल-ताशांचा गजर, टाळमृदंगाची साथ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या ‘मानाचा पहिला- श्री कसबा गणपती’ची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा पार पडला असून, अमेरिकेत दहा दिवसांसाठी कसबा गणपतीची प्रतिकृती विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा! पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, आशिष शेलार यांची ग्वाही

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आश्वासित केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात अॅड. शेलार बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com