विकेंडला जास्त झोपून आठवडाभराची झोप भरून निघते का?

Bharat Jadhav

वीकेंडला जास्त झोपणे

बहुतेकजण सुट्टीच्या दिवशी निवांतपणे उशिरापर्यंत झोपतात. इतर कोणत्याही वयोगटापेक्षा तरुण मुलं वीकेंडला सर्वात जास्त वेळ झोपून राहतात.

Sleeping More on Weekends

किती तास झोपावे

प्रौढ व्यक्तींनी रोज 7 ते 9 तास झोपावे असा सल्ला दिला जातो. तर तरुण मुलांना रोज 8 ते 10 तासांची झोप हवी असते. परंतु कामाच्या धावपळीत अनेकांना शक्य होत नाही

Sleeping More on Weekends

शरीरावर झालेला वाईट परिणाम कमी होतो का?

आठवड्यातून रोज नीट झोप मिळाली नाही, तर वीकेंडला उशिरापर्यंत झोपून ती भरून काढणे योग्य आहे का? अपुऱ्या झोपेचा शरीरावर झालेला वाईट परिणाम खरंच कमी होतो का?

Sleeping More on Weekends

झोप झाली नाहीतर...

रात्री नीट झोप झाली नाही, तर त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर आणि शरीराच्या अंतर्गत कार्यावर मोठा ताण पडतो. एका संशोधनात काही लोकांना एका रात्री फक्त 2 तासच झोपू दिले गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शरीरात 2 प्रकारच्या पांढऱ्या पेशी वाढल्याचे दिसून आले.

Sleeping More on Weekends

झोपेचे गणित बिघडतं

वीकेंडला जास्त झोप काढण्याच्या नादात आपली 'स्लीप टँक' आणि शरीराचे 'जैविक घड्याळ' या दोन्हीचे गणित बिघडतं. आदल्या दिवशी जास्त वेळ झोपल्याने पुढच्या झोपेसाठी लागणारा शरीराचा नैसर्गिक दबाव कमी होतो. त्यामुळे त्या रात्री डोळ्यांना लवकर झोपच लागत नाही.

Sleeping More on Weekends

एकाग्रता कमी होते

अपुऱ्या झोपेची सवय अनेक आठवडे किंवा महिन्यापासून असेल तर वीकेंडची झोपही पुरेशी पडत नाही. यामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवण्याची, पटकन निर्णय घेण्याची क्षमता आणि आजूबाजूच्या स्थितीचा अंदाज बांधण्याची क्षमता यावर याचा परिणाम होतो.

Sleeping More on Weekends

झोप भरून काढणे वाचवू शकते जीव

रात्री नियमितपणे 6 ते 7 तास झोप घेत होत्या त्यांच्यात मृत्यूचा धोका सर्वात कमी होता. तर जे 5 तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतात त्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका 65 टक्के जास्त असतो.

Sleeping More on Weekends

वेळेवर झोपणाऱ्या लोकांप्रमाणेच आरोग्य सुरक्षित

एका संशोधनानुसार, आठवडाभर कमी झोपलेल्या लोकांनी जर सुट्टीच्या दिवशी झोप भरून काढली तर रोज वेळेवर झोपणाऱ्या लोकांप्रमाणेच त्यांचे आरोग्य सुरक्षित राहते.

वीकेंडला किती वेळ झोपावं

1 ते 2 तासांची जास्तीची झोप ही अगदी 'परफेक्ट' ठरते. अमेरिका आणि कोरियातील अभ्यासानुसार, वीकेंडला फक्त 1 ते 2 तास अतिरिक्त झोप घेतल्याने डिप्रेशनचा धोका सर्वात कमी राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.