Shreya Maskar
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड शहराजवळ असलेला एक डोंगरी किल्ला आहे. वीकेंडला तुम्ही येथे ट्रेक प्लान करा.
शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये हा किल्ला जिंकला. ज्याचे मूळ नाव 'रायरी' होते. शिवरायांनी १६७४ मध्ये रायगड किल्ल्याला राजधानी (हिंदवी स्वराज्य) बनवले.
१६५६ ते १६७४ दरम्यान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात रायगड किल्ल्याचा विस्तार केला गेला आणि प्रमुख स्थापत्यशास्त्राचे काम सरदार हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली केले गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झाला.
युरोपियन इतिहासकारांनी रायगडाला 'पूर्वेचे जिब्राल्टर' असे संबोधले कारण त्याच्या सर्व बाजूंनी उभ्या उभ्या उंच कडांमुळे थेट हल्ल्याने जिंकणे जवळजवळ अशक्य होते.
तुम्ही मुंबईहून बाय रोड, ट्रेनने किंवा बसने ३ ते ५ तासात रायगड किल्ल्यावर पोहोचू शकता. एकूण अंतर सुमारे 150 किलोमीटर आहे.
रायगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. मित्रांसोबत ट्रेक प्लान करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.