Maratha History saam tv
वेब स्टोरीज

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंधन म्हणून कशाचा वापर केला जायचा?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोक नैसर्गिक इंधनावर अवलंबून होते. लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि पिकांचे अवशेष यांचा स्वयंपाकासाठी वापर केला जात होता, तर प्रकाशासाठी तेलाचे दिवे आणि मशालींचा आधार घेतला जात होता.

Surabhi Jayashree Jagdish

इंधन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आजच्या सारखे LPG किंवा वीज उपलब्ध नव्हती. त्या काळात लोक मुख्यतः नैसर्गिक इंधनावर अवलंबून होते.

इंधनाचा वापर

स्वयंपाक, प्रकाश आणि उष्णतेसाठी लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर जैवइंधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. जाणून घेऊया या इंधनाचा वापर कसा केला जात होता.

लाकूड

त्या काळात स्वयंपाकासाठी लाकूड सर्वात जास्त वापरलं जात होतं. जंगलातील सुकलेली झाडे, फांद्या आणि काटक्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक केला जात असे.

शेणाच्या गोवऱ्या

गायी-गुरांच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत असे. या गोवऱ्या वाळवून इंधन म्हणून वापरल्या जात. हे इंधन स्वस्त, सहज उपलब्ध आणि ग्रामीण भागात अत्यंत उपयोगी मानले जात असे.

पिकांचे अवशेष

शेतीतून उरलेले काडीकचरा, भुसा, ऊसाच्या सुक्या भागाचा वापर इंधन म्हणून केला जात असे. हे सर्व जैवइंधन प्रकारात येतं.

तेल व तुपाचे दिवे

प्रकाशासाठी दिव्यांमध्ये तेल किंवा तूप वापरलं जात असे. वीज नसल्यामुळे हा मुख्य प्रकाशाचा स्रोत होता. धार्मिक तसंच दैनंदिन जीवनात त्याचा वापर होत असे.

मशाली व कंदील

रात्रीच्या वेळी मशाली वापरून प्रकाश केला जात असे. किल्ले, रस्ते आणि युद्धाच्या वेळी मशाली अत्यंत महत्त्वाच्या होत्या.

Raigad fort history

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Maharashtra Live News Update: मनसेची उद्या मुंबईत बैठक

Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

Wrinkle Free Skin: चेहऱ्यावरच्या सुरकुत्या होतील गायब, ट्राय करा हे स्वस्तात मस्त उपाय

रेल्वे कर्मचाऱ्यांना लॉटरी, पगारात बंपर वाढ; KA मध्ये २५ टक्क्यांची वाढ, वाचा कुणाला होणार फायदा?

Onion Pickle Recipe: घरच्या घरी कांद्याचं लोणचं कसं बनवाल?

SCROLL FOR NEXT