Sakshi Sunil Jadhav
अनेक महिलांच्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे त्यांना बाहेर पडणं कठीण होतं.
जर त्वचा तिशीतच निस्तेज दिसायला लागली की, कोणतेही प्रोडक्ट्स चेहऱ्याला सूट होत नाहीत. कधीकधी यासमस्या अचानक वाढू शकतात.
सध्याच्या ताणामुळे, चुकीच्या खाण्यापिण्यामुळे, कमी झोपेमुळे आणि वाढत्या प्रदुषणामुळे तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागतं.
तुम्ही रोजरात्री झोपताना थोडं नारळाचा तेल चेहऱ्याला लावून थोडा मसाज करुन झोपू शकता. त्याने चेहरा सॉफ्ट होतो आणि उजळतो.
तुम्ही मिळेल तेव्हा अॅलोवेरा जेल किंवा त्याच्या फांदीचा तुकडा चेहऱ्यावर १० मिनिटे रगडू शकता. याने सुरकुत्या गायब होतात.
तुम्ही मधाचा आणि लिंबाचा वापर चेहरावर करु शकता. याचा एक फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर धूवा. याने सुरकुत्या कमी होतात.
पिकलेलं केळ घेऊन मॅश करून तुम्ही चेहऱ्याला लावून ठेवू शकता. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करून घ्या. याने स्कीनला जास्त फायदा होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.