Sakshi Sunil Jadhav
आजच्या काळात प्रत्येकाला परफेक्ट लुक हवा असतो. आकर्षक डोळे आणि घनदाट भुवया चेहऱ्याचं सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. पण पोषणाची कमतरता, केमिकल प्रोडक्टचा वापर करुन केलेला मेकअपमुळे भुवयांचे केस पातळ आणि कमकुवत होतात.
तुमच्या सगळ्या समस्या या एका तेलामुळे कमी होतील. कारण यामध्ये व्हिटॅमिन E, फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
सुरुवातीला हे तेल केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि नवीन केस उगवण्यास मदत करतं.
डायरेक्ट मसाज करा. त्यासाठी रात्री झोपण्याआधी 2-3 थेंब आर्गन ऑईल लावून हलक्या हाताने मसाज करा.
कॅस्टर ऑईलसोबत आर्गन आणि कॅस्टर ऑईल समान प्रमाणात मिक्स करुन लावल्यावर लगेचच परिणाम दिसून येईल.
अॅलोवेरा जेलसोबत सेंसिटिव्ह स्किनसाठी आर्गन ऑईल आणि एलोवेरा जेलचा वापर सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
आठवड्यातून 4 ते 5 वेळा वापर केल्यावर भुवया घनदाट, काळ्या आणि मजबूत होतात आणि तुमच्या सौंदर्यात भर पडेल.
कोणताही नवीन उपाय वापरण्यापूर्वी स्किन टेस्ट करणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.