बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आहारात बदल झाला आहे. आता फक्त तरुणच नाही तर त्यांच्या पालकांनासुद्धा महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन जंक फूड खायला आवडतंय. जग कितीही मॉर्डन झालं तरी खाण्याच्या बाबतीतला हा मॉर्डनपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो. कारण जर तुम्हाला तरुणपणीच ब्लड प्रेशरचा त्रास होत असला तर तुम्हाला वयाच्या चाळीशीनंतर खूप हेवी डाएट प्लान फॉलो करावा लागेल.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुमचे ब्लड प्रेशर खूप वाढत असेल तर औषधांसोबत तुम्ही आहारात बदल केले पाहिजेत. बरं यासाठी तुम्हाला जंक फूडला लागतात ऐवढे पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सगळे पदार्थ तुम्हाला स्वयंपाकघरातच सापडतील. पुढे आपण त्या स्पेशल आणि BP नियंत्रणात ठेवण्यासाठी खाल्या जाणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.
१. पांढरे चणे खाण्याचे फायदे
तुमच्या घरात पांढरे चणे किंवा काळे चणे असतीलच. हरभऱ्यापासून हा पदार्थ बनतो जो दक्षिण भारतीय नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि पोटॅशियम मिळवण्यासाठी खाल्ला जातो. यातले घटक तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. तसेच यात कमी फॅट आणि प्रोटीनचाही समावेश असतो.
२. आवळ्याचे फायदे
आवळा हा नैसर्गिक व्हिटॅमिन C चा उत्तम असतो. त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि गुणधर्म रक्तवाहिन्या स्वच्छ करण्याचं काम करतात. आवळ्याचे सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत होतो. त्याने हार्ट व्यवस्थित काम करतं.
३. चिंचेचे फायदे
चिंच ही आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असली तरी ती तुमच्या ह्रदयासाठी खूप फायदेशीर असते. चिंचेमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येतं. यासोबतच, ती कोलेस्ट्रॉल कमी करून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.
४. कढीपत्त्याचे फायदे
कढीपत्ता हा तुम्ही फक्त फोडणीत खालून चव वाढवण्यासाठी वापरता, पण त्याचे इतर हेल्दी फायदे खूप आहेत. कढीपत्त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर शरीरातले खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे ब्लड प्रेशर राहतं आणि हार्ट हेल्दी राहतं. या सर्व पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.