Shreya Maskar
कल्याण हे मुंबईजवळील एक उत्तम विकेंड गेटवे लोकेशन आहे. दुर्गाडी किल्ला, काळा तलाव, मलंगगड, गणेश घाट आणि बिर्ला मंदिर हे येथील मुख्य आकर्षणे आहेत.
दुर्गाडी किल्ला हा १६ व्या-१७ व्या शतकातील एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण भागात, उल्हास नदीच्या खाडीजवळ असलेल्या एका टेकडीवर वसलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्या नौदलाची (आरमाराची) स्थापना ज्या ठिकाणी केली, त्या ठिकाण म्हणून दुर्गाडी किल्ला प्रसिद्ध आहे.
दुर्गाडी किल्ल्यावर भवानी दुर्गामातेचे प्राचीन मंदिर आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येते.दरवर्षी नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो.
दुर्गाडी किल्ल्याला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने पुढे जाऊ शकता. वन डे ट्रिपसाठी हे चांगले ठिकाण आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करायला काही हरकत नाही.
उल्हास नदीच्या काठावर वसलेला कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा सुमारे ३५० ते ३७० वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक किल्ला आहे. सागरी व्यापारावर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
दुर्गाडी किल्ला हा उल्हास खाडीच्या किनारी असलेल्या 'गणेश घाट' आणि येथील भव्य गणेश मंदिर/दरवाजासाठी प्रसिद्ध आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.