Shreya Maskar
वीकेंडला पुण्याची ट्रिप प्लान करा. पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. पुण्यात गेल्यावर तेथील लोखंडासारखा मजबूत किल्ल्याला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील लोणावळा आणि पुणे शहरांजवळ लोहगड किल्ला वसलेला आहे. लोहगड किल्ला २००० वर्षांच्या प्राचीन इतिहासासाठी, ३३८९ फुटांच्या नेत्रदीपक उंचीसाठी आणि भक्कम , सुस्थितीत असलेल्या मराठा स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे.
लोहगड किल्ला लोखंडासारखा मजबूत आहे. विंचवाच्या शेपटीसारख्या आकाराच्या 'विंचू काटा' या तटबंदी हे किल्ल्याचे आकर्षण आहे.
लोहगड किल्ला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भटकंतीसाठी, ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. इ.स.पू. १ल्या किंवा २ऱ्या शतकातील सातवाहन काळात झाला असावा, असे मानले जाते. ट्रेकिंग करताना सह्याद्री पर्वतरांगेचे विहंगम दृश्य दिसते.
'महा दरवाजा', विंचवाच्या नांगीसारखी दिसणारी 'विंचू काटा' तटबंदी, तसेच किशोरी महाल, लक्ष्मी कोठी आणि प्राचीन पाण्याची टाकी हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे.
लोहगड किल्ला ज्याला 'लोहदुर्ग' किंवा 'Iron Fort' (लोखंडी किल्ला) असेही संबोधले जाते. किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
लोहगड किल्ल्याजवळ विसापूर किल्ला, भाजे लेणी, पवना तलाव, कार्ले लेणी आणि लोणावळा ही पर्यटन स्थळे आहेत. लोणावळ्याला वन डे ट्रिप प्लान करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.