Panvel Tourism : निसर्गरम्य दृश्यांची पर्वणी, 'पनवेल'मध्ये लपलाय ८०० वर्ष जुना ऐतिहासिक किल्ला

Shreya Maskar

पनवेल

कर्नाळा किल्ला ज्याला फनेल हिल असेही म्हटले जाते, हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या आत वसलेला आहे.कर्नाळा किल्ला पनवेलपासून अंदाजे १०-१३ किमी आणि मुंबईपासून ६२-६५ किमी अंतरावर आहे.

Panvel | google

ट्रेकिंग स्पॉट

समुद्रसपाटीपासून सुमारे १,५०० फूट उंचीवर असलेला कर्नाळा किल्ला १-२ तासांचा ट्रेकिंग स्पॉट आहे. तुम्ही येथे वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Trekking | google

किल्ल्याचे वैशिष्ट्ये

कर्नाळा किल्ला मध्यवर्ती काळ्या पाषाणाच्या सुळक्यासाठी (स्तंभासाठी), सह्याद्रीच्या विहंगम दृश्यांसाठी, पक्षीनिरीक्षणाच्या संधींसाठी आणि समृद्ध मराठा इतिहासासाठी ओळखला जातो.

Fort | google

पक्षी निरीक्षण

कर्नाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. कर्नाळा किल्ल्याचा आजूबाजूचा प्रदेश पक्षी निरीक्षणासाठी ओळखला जातो.

Birdwatching | google

टेहळणी बुरुज

कर्नाळा किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर असलेला १२५ फूट उंच काळ्या पाषाणाचा मध्यवर्ती स्तंभ पांडूचा बुरुज (सुळका) पूर्वी याचा वापर टेहळणी बुरुज म्हणून केला जात असे.

Watchtower | google

कर्नाळा पक्षी अभयारण्य

कर्नाळा पक्षी अभयारण्य १५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींचे माहेरघर असून, येथे निसर्गाच्या सानिध्यातून जाणारे सुंदर मार्ग उपलब्ध आहेत. लहान मुलांसोबत पिकनिकसाठी हे उत्तम लोकेशन आहे.

Karnala Bird Sanctuary | google

निसर्ग सौंदर्य

कर्नाळा किल्ल्याच्या शिखरावरून प्रबळगड, माणिकगड, हाजी मलंग आणि माथेरान हे थंड हवेचे ठिकाण यांचे विहंगम दर्शन घडते. तुम्ही येथे सुंदर फोटो काढू शकता.

Natural Beauty | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : मुंबईकरांनो उन्हाने हैराण झालाय? 'ही' ५ हिल स्टेशन्स देतील गारवा, आजच करा ट्रिपचा प्लान

Mumbai Tourism | saam tv
येथे क्लिक करा...