Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Ladki Bahin Yojana eKYC Deadline: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसीमध्ये दुरुस्त करण्यासाठी शेवटचा आठवडा उरला आहे. तुम्हाला ३० एप्रिलपर्यंत केवायसी करायचे आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केवायसीसाठी शेवटची संधी

८ दिवसात केवायसी करा अन्यथा लाभ होईल कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांनी काही चुका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. प्रश्न व्यवस्थित कळला नसल्याने त्यांनी चुकीची उत्तरे दिली आहेत. दरम्यान, आता या महिलांना चुक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १३ दिवस; लाडक्या बहिणींकडे चूक सुधारण्याची शेवटची संधी; ₹१५०० साठी आताच हे काम करा

लाडकी बहीण योजनेत आता ३० एप्रिलपर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. दुरुस्ती केल्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत आता केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटचा एक आठवडा उरला आहे. तुम्हाला त्याआधी केवायसी पूर्ण करायची आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojana eKYC Step By Step Process)

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची संपूर्ण प्रोसेस ऑनलाइन असणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.

सर्वात आधी तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकून ओटीपी येईल त्यावर क्लिक करा.

यानंतर केवायसीमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे.

तुम्ही प्रश्नांची योग्य उत्तरे दिली की तुमची केवायसी पूर्ण होणार आहे. यानंतर तुमचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : कामाची बातमी! इतक्या लाख लाडक्या बहि‍णींची खाती बंद, लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही ना? ३० एप्रिलपर्यंत आणखी एक संधी

केवायसी पूर्ण केल्यानंतर लाभ पुन्हा सुरु होणार

लाडकी बहीण योजनेत तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. जेवढे हप्ते आतापर्यंत मिळाले नव्हते तेवढे हप्ते दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात एकत्र तीन महिन्याचे हप्ते येऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ७० लाख महिलांचा ₹१५०० चा हप्ता बंद, अपात्र लाडकींकडून सरकार पैसे वसूल करणार? महत्त्वाची माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com