

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
केवायसीची डेडलाइनसाठी उरले फक्त १३ दिवस
आजच हे काम करा अन्यथा लाभ होईल कायमचा बंद
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. मार्च महिना उलटून गेला तरीही अजून पैसे जमा झाले नाही. आता एप्रिलचेदेखील १५ दिवस उलटले आहेत. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. याचसोबत पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक काम करायचे आहे. लाक्या बहिणींना केवायसी करायची आहे.
केवायसीची डेडलाइन (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)
लाडकी बहीण योजनेत फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसीची डेडलाइन उलटून गेली आहे. दरम्यान, केवायसीत अनेक महिलांच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना चुका दुरुस्त करण्याची अजून एक संधी दिली आहे. महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसीमधील चुका सुधारता येणार आहे. त्यामुळे तुम्हीही हे काम लगेच करा. तुमच्याकडे फक्त शेवटचे १३ दिवस उरले आहेत.
ईकेवायसी कोणी करावी? (Ladki Bahin Yojana Who Will do Ekyc)
लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुक झाल्यामुळे महिलांचे लाभ बंद झाले आहेत. जर तुम्ही केवायसी केली असेल अन् तुमचा लाभ बंद झाला असेल तर कदाचित तुमच्या केवायसीत चुका झालेल्या असू शकतात. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीमधील चुका सुधारायच्या आहेत. यानंतर महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल. ज्या महिलांनी केवायसी केले त्यांना योजनेचा लाभ तसाच दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.