

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
६८ लाख महिलांचा लाभ बंद
सरकारचे १२२४० कोटी वाचणार
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ६८ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ६८ लाख महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे सरकारचे जवळपास १२२४० कोटी रुपये वाचणार आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र झाल्यावर आपोआप निधी कमी लागणार आहे.
६८ लाख महिलांचे लाभ बंद (Ladki Bahin Yojana 68 Lakh Women Benefit Stopped)
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता महिला ३० एप्रिलपर्यंत केवायसी करु शकतात. दरम्यान, आता लाखो महिला योजनेतून बाद झाल्याने महिलांना इतर विभागाकडून निधी घेण्याची गरज पडणार नाही.
लाडकी बहीण योजना जुलै २०२४ रोजी सुरु केली होती. या योजनेत सुरुवातीला २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. यामधील फक्त १ कोटी ४७ लाख महिलांनी ईकेवायसी पूर्ण केले आहे. त्यामुळे ६८ लाख महिला योजनेतून वगळल्या आहेत.
ईकेवायसी न केल्यास लाभ बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)
लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थ्यांनी केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. केवायसी न केलेल्या ६८ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या २० महिन्यात अपात्र महिलांच्या खात्यात तब्बल २० हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्यामुळे या लाभ बंद झाल्याने सरकारचे तब्बल १२२४० कोटी रुपये वाचणार आहेत. या योजनेसाठी वर्षभरात ४३७४० कोटी रुपयांचा खर्च येईल, असं सांगण्यात येत आहे. आता फक्त ३१५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.