Viral Video: बाईपण भारी देवा! लोकलमध्ये महिलांचा थाटामाटात हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम; VIDEO तूफान व्हायरल

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात लोकलमधील महिलांनी चक्क लोकलमध्येच हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम साजरा केला आहे.व्हायरल व्हिडिओ पहा.
Mumbai Local Train
Viral VideoSaam Tv
Published On

Haldi Kunku Celebration: मुंबई शहराची खास ओळख म्हणून मुंबई लोकल ट्रेनला ओळखले जाते.दर मिनिटांला अनेक प्रवासी विविध स्वप्ने आणि जबाबदाऱ्या सोबत घेऊन प्रवास करत असतात.सणाच्या दिवशीही मुंबई लोकल ट्रेन प्रवाशांनी भरलेली असते.मग अनेकदा विविध सण लोकल ट्रेनमध्येच साजरे केले जातात,सध्या असाच एक व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील व्हायरल होत आहे,ज्यात चक्क महिला वर्गाने लोकलध्ये हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केलेला आहे.

हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम प्रत्येक महिलेसाठी खास असतो.हा कार्यक्रम खास होण्यासाठी प्रत्येक महिला तिच्या परिने प्रयत्न करत असते.सोशल मीडियावर हळदी-कुंकूवाचा कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,मात्र पहिल्यांदा चक्क मुंबई लोकल ट्रेन(Local Train)मध्ये साजरा केलेला हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पंसतील आलेला आहे.

मुंबई लोकलमधील सर्व व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पाहिला जात असून तो इन्स्टाच्या ''sayli_moonchild'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेला आहे शिवाय तासनतास व्हिडिओला हजारो संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''हळदी कुंकू समारंभ मुंबई लोकलमध्ये''असे लिहिण्यात आलेले आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...

महिलांनी लोकलमध्ये हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम केल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलेला आहे,शिवाय नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील अनेक यूजर्संनी लिहिले आहे,''महिला काय करतीस सांगता येत नाही'' तर अनेक यूजर्संनी लिहिले,''मस्तच कार्यक्रम केला आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : लोकलमध्ये हळदी-कुंकूवाचा कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mumbai Local Train
Local Train Viral Video: ट्रेन पकडण्यासाठी तरुणाचा जीवाशी खेळ; गर्दीत अडकला आणि पतंगासारखा हवेत लटकला...पाहा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com