Viral Video: भयंकर! सिगारेट देण्यास नकार दिला, तरुणीने पेट्रोल पंपावर थेट कार पेटवून दिली| धक्कादायक VIDEO

Viral Video News: पुरुषाने महिलेला सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे महिला नाराज होते. ती परत येते आणि लायटरने कारमध्ये भरलेले पेट्रोल पेटवून देते आणि पळून जाते. यानंतर संपूर्ण वाहनाला आग लागते.
Viral Video
Viral VideoSaamtv
Published On

Viral Video News:

सोशल मीडियावर भांडणाचे, मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. क्षुल्लक कारणावरुन मोठा राडा झाल्याच्याही अनेक घटना, पाहायला, ऐकायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका तरुणीने अगदी क्षुल्लक कारणावरुन पेट्रोल पंपावर कार पेटवून दिल्याची घटना घडली.

रागाच्या भरात कोण काय करेल हे सांगता येत नाही. अगदी क्षुल्लक कारणावरुन अनेकजण मोठा वाद उभा करतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीने चक्क सिगारेट देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीची कार पेटवून दिली. या भयानक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पेट्रोल पंपावर उभा आहे आणि तो त्याच्या कारमध्ये पेट्रोल भरत आहे. तेवढ्यात एक स्त्री त्याच्या समोर येते आणि त्याला सिगारेट मागू लागते. पुरुषाने महिलेला सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे महिला नाराज होते. ती परत येते आणि लायटरने कारमध्ये भरलेले पेट्रोल पेटवून देते आणि पळून जाते. यानंतर संपूर्ण वाहनाला आग लागते.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
PM Narendra Modi : मला तिसऱ्या टर्मसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, पण...; PM नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

हा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म X वर @PicturesFoIder नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लिहिपर्यंत हा व्हिडिओ 12 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर हजारो लोकांनी याला लाईक केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी महिलेला तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Viral Video
Manmad News : रात्रीच्या वेळी भर रस्त्यात प्रसुतीकळा; तृतीयपंथीयाच्या मदतीने सुखरुप झाली प्रसुती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com