अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील माहेर वासीन असलेल्या गर्भवती ऊसतोड मजूर (Nashik) महिला दुचाकीवरून जात असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. ही घटना रात्रीच्या सुमारास (Nandgaon) नांदगाव रेल्वे गेटजवळ घडली. (Breaking Marathi News)
ऊसतोड मजूर मंगला चव्हाण ही गर्भवती महिला आपल्या सासू सासऱ्यांसह (Ahmednagar) अहमदनगर येथून दुचाकीवरुन नांदगाव येथे येत होती. रात्रीच्या सुमारास नांदगाव रेल्वे गेटजवळ पोहचले असताना अचानक तीला प्रसुतीकळा येऊ लागल्या. यानंतर सासरे सुदाम चव्हाण यांनी दुचाकी बाजूला उभी केली. याच वेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तृतीयपंथीयाने क्षणाचा विलंब न करता तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदत घेत स्वतःची साडी सोडून कपडे आडवे लावत महिलेची प्रसुती केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दोघेही सुखरूप
यानंतर तातडीने ग्रामीम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. कर्मचारी तात्काळ तेथे हजर होऊन त्यांनी बाळ आणि आईची सावकाशपणे नाळ कापून प्रसुत महिलेला आणि आईला पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. तृतीयपंथाने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यात प्रसुती झालेल्या या महिलेला गोंडस कन्यारत्न झाले असून सासरे सुदाम चव्हाण यांनी या सर्वांचे मनापासून आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.