
Extramarital Affair Video: समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पत्नीने आपल्या नवऱ्याला खोलीत एका परस्त्रीसोबत पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घरगुती वादातून थेट मारहाणीपर्यंत मजल गेली. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे आणि अनेकजण यावर आपली प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजू शकले नाही. संबंधित पत्नी(Husband-wife) बऱ्याच दिवसांपासून नवऱ्याच्या वागणुकीकडे संशयाने पाहत होती. तो सतत फोनवर कोणाशी तरी बोलत असे शिवाय उशीरापर्यंत बाहेर राहत असे आणि त्याच्या वागणुकीत बदल जाणवत होता. अखेर एके दिवशी ती अचानक घरी परत आली आणि जे दृश्य तिला दिसले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
ती घराच्या खोलीत पोहोचली असता तिचा नवरा एका परस्त्रीसोबत आढळला. ही दृश्य पाहताच संतापलेल्या पत्नीनं जोरदार आरडाओरड केली आणि तिथेच वादाला सुरुवात झाली. त्या महिलेला तिने घराबाहेर हाकलून लावलं. नवऱ्यावर हात उचलण्यातही ती मागे हटली नाही. याचा व्हिडिओ शेजाऱ्यांनी काढला आणि तो थेट सोशल मीडियावरही टाकला आहे.
सध्या हा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवरील sarcasmicguy या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. या अकाउंटवर हा व्हिडिओ एका दिवसापूर्वी अपलोड करण्यात आला असून आतापर्यंत याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''चांगला बांबूने हाणला पाहिजे होता'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''आता लग्नावरचा पूर्णच विश्वास उडाला आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.