Viral Dance Video: "उई अम्मा" गाण्यावर चिमुकलीचा धम्माकेदार डान्स, भावाने घेतली अशी एंट्री की सगळेच फिदा; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर देशभरातील अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतील पडतात. सध्याचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्यातीलच एक आहे.
Little Girl Dance Video
Viral Dance VideoSaam Tv
Published On

Little Girl Dance Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अरुणाचल प्रदेशातील एक गोंडस छोटी मुलगी 'उई अम्मा' या गाण्यावर डान्स करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरील निरागस हावभाव आणि हरकती पाहून अनेकजण प्रेमात पडले आहेत. पण खरी मजा तेव्हा येते, जेव्हा तिचा भाऊ अचानक व्हिडिओमध्ये एन्ट्री घेतो. नेमके व्हिडिओत पुढे काय घडते ते एकदा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पाहा.

व्हायरल (VIRAL) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक चिमुकली दिसून येत आहे. जिने पिवळ्या रंगांचा सुदंर ड्रेन परिधान केलेला आहे, जो तिला अतिशय छान दिसत आहे. त्यानंतर चिमुकली व्हिडिओत पाहात डान्स करण्यास सुरुवात करते. चिमुकलीचे गाण्याच्या बीटवरील सोज्वळ आणि गोड हावभाव हे प्रत्येकाचं मन जिंकतात आणि एकदम भन्नाट डान्स करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. मात्र, चिमुकलीच्या पाठी पाहिले असता तिचा भाऊ पडद्याच्या पाठून लपून पाहतो. त्या दोघांची क्युट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करते आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम, ट्वीटर, फेसबूक यावरही हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज याला मिळत आहेत. सध्या तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील kenrick_gamlin5 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. या अकाउंटवर तुम्हाला या चिमुकलीचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील, जे व्हिडिओ लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिले आहे.

चिमुकलीचा डान्स (DANCE) प्रत्येक नेटकऱ्यांच्या फक्त पसंतील पडलेला नाही तर,त्यावर त्यांनी विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''चिमुकलीला नजर नको लागायला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कसला भारी डान्स करतेय'' अशा प्रकारे चिमुकलीच्या डान्सचे कौतुकच होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Little Girl Dance Video
Viral Dance Video: तृतीयपंथीचा ट्रेनमध्ये कल्ला! मराठी गाण्यावर धरला ठेका; मुंबई लोकलमधील व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com