Snake Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: शाळेच्या शूजमध्ये लपला होता साप,चिमुकल्याने बूटात पाय घातला अन्...पुढे जे घडलं ते पाहून सर्व हादरले

Snake Viral Video: सोशल मीडियावर सध्या भोपाळमधील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या घटनेत एका चिमुकल्याच्या बुटामध्ये साप लपून बसलेला आढळलेला आहे.व्हायरल व्हिडिओ पहाच.
Published on

Viral Video: सोशल मीडियावर आजवर अनेक सापांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.साप एक असा प्राणी आहे जो कधीही आणि कुठेही लपून बसू शकतो.जंगलाच्या परिसरात तसेच गावात असलेल्या मानवी वस्तीत बऱ्याचदा साप पाहण्यास मिळत असतो.त्यात सध्या एक भयानक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात एक चिमुकल्याच्या शाळेच्या शूजमध्ये साप आढळून आलेला आहे.

सध्या सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल(Viral)होत आहे.लहान मुलं असो की मोठी व्यक्ती बाहेर जाताना घाईघाईत चपला असो वा बुट घालतात आणि तसेच बाहेर जातात.मात्र आता ही सवय तुम्हाला असेल तर अत्यंत सावधगिरी बाळगण्यास पाहिजे.कारण तुमच्या किंवा तुमच्या लहान मुलाच्या बुटांमध्ये साप लपलेला असू शकतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला,विद्यार्थ्याच्या शाळेचा काळ्या रंगाचा शूज दिसत आहे.जर व्हिडिओत नीट पाहिले तर त्या काळ्या रंगाच्या शूजमध्ये एक साप वेटोळे घालून बसलेला आहे.व्हायरल होत असलेली घटना भोपालमधील असल्याचे समजत आहे.

सापाचा(Snake) व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ndtvmpcg या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांमध्ये पाहिला गेला असून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''काळजी घेतली पाहिजे मुलांची'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे,''दिवसेंदिवस काय होत आहे हे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : बुटात साप आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Snake Viral Video
Snake Viral Video : बापरे बाप! बेडवर थेट गादीखाली लपला होता साप; तरुण झोपायला गेला अन्... VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com