

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये दावा केला जातोय की, मुलाने एका त्याच्या वयापेक्षा जास्त असलेल्या महिलेसोबत फिरतोय. यामुळे तो गर्लफ्रेंडची फसवणूक करत असल्याचंही म्हटलंय.
सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. त्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडला एका वयाने मोठी असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा महिलेबरोबर पाहते. या घटनेनंतर दोघांमध्ये झालेला वाद आणि तरुणीची प्रतिक्रिया या व्हिडीओमध्ये दिसतेय. यामुळे नात्यातील विश्वास, प्रामाणिकपणा आणि इमोशनल बॉन्डिंग यावर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागलीये.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणी अचानक एका ठिकाणी पोहोचते. ज्या ठिकाणी तिला तिचा बॉयफ्रेंड एका वयाने मोछ्या असलेल्या महिलेसोबत हसत-गप्पा मारताना दिसतो. दोघांमधील जवळीक पाहून तरुणी अस्वस्थ झाल्याचं तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये पुढे ती बॉयफ्रेंडसोबत वाद घालताना दिसतेय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ती महिला शूटींग बंद करा असं सांगत असते. यावेळी ती महिला, हे काय सुरू आहे, असा प्रश्नही त्या तरूणीला विचारते. यावेळी, मी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं ती मुलगी सांगते. तसंच, तुम्हाला असं करताना लाज वाटत नाही का असा सवालही ती करते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. काही प्रेक्षकांनी तरुणीबद्दल सहानुभूती व्यक्त केलीये. यावेळी एका युजरने 'विश्वास तुटल्याची वेदना सर्वात कठीण असते', अशी प्रतिक्रिया दिलीये. तर काहींनी संपूर्ण सत्य समजल्याशिवाय निष्कर्ष काढू नये, असं मत मांडलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.