
Trendin Viral Video: अनेकदा प्रवास करत असताना तुम्हीही रेल्वे फाटक बंद असल्याने ते उघडण्याची वाट पाहत थांबला असाल.अनेकदा काहीजण अतिघाईमुळे रेल्वे प्रशासनाचे नियम डावलून ते फाटक क्रॉस करुन जातात.सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एका तरुणाने चक्क आपली बाईक खांद्यावर उचलून थेट रेल्वे फाटक ओलांडताना दिसत आहे.तरुणाचा हा स्टंट पाहून नेटकरी हैराणही झालेले आहेत.
व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेल्वे रुळाचा परिसर दिसत आहे.रेल्वे रुळावरुन ट्रेन जाणार असल्याने दोन्ही बाजूचे फाटक बंद झालेले आहे.त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहन चालक थांबलेले आहेत.अशातच त्याचमधील एक तरुण चक्क आपली बाईक खांद्यावर उचलतो आणि चालत चालत रेल्वे फाटक क्रॉस करतो.अतिशय जड असलेली बाईक तरुण अलगद खांद्यावर उचलो ते पाहून अनेकजण हैराणही झाले मात्र त्याचबरोबर काहीजणांनी संतापही व्यक्त केला आहे.
सध्या चर्चेत आलेला व्हिडिओ हा एक्सवरील @gharkekaleshया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.हा अजब प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स मिळवून दिलेले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.
तरुणाच्या(Young Man) या अजब धाडसाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''दर वेळी वेगळे पाहण्यासाठी मिळते'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''बापरे''तर काही यूजर्संनी मजेशीरही प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत ना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.