Viral Video: मानलं राव! रेल्वेत प्रवाशाची अनोखी शक्कल, दरवाजा बंद करण्यासाठी केला हटके जुगाड; पाहा VIDEO

Deshi Jugad Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक्सप्रेस ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रवाशांनी काय केले तुम्ही पाहा.
Deshi Jugad Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. अनेकदा हे व्हिडिओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ पाहून अनेक नवीन कल्पना सुचतात मात्र त्यातच काही व्हिडिओ अत्यंत गमतीदार असतात जे पोट धरून हसण्यावर भाग पाडतात. सध्या असातच एक एक्सप्रेस ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांनी जबरदस्त हटके जुगाड शोधलेला आहे. नक्की काय असेल व्हायरल होत असलेला जुगाड ते तुम्ही पाहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक्सप्रेस ट्रेन(Train) दिसत असून तुम्हाला ट्रेनमधील एक कंपार्टमेंट दिसत आहे. जिथे अनेक प्रवासी कंपार्टमेंट झोपलेले आहेत,मात्र या कंपार्टमेंटमधील एक दरवाजा आहे. जो काही कारणामुळे खराब झालेला असून दरवाजा लावताना आणि उघडताना त्याचा अत्यंत आवाज येत असे. याच कारणामुळे तिथे असलेल्या प्रवाशांनी उशी त्या दरवाजाला लावली ज्यामुळे दरवाजा उघडताना दरवाजा आवाज येणार नाही. संपूर्ण व्हिडिओ(Video) ट्रेनमधील एका महिला प्रवासाने कॅमेऱ्याक कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@priyarajputlive'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. शिवाय अनेक गमतीदार प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Deshi Jugad Viral Video
Viral Video: सुपरमॉम! इवल्याशा जिवाला जबड्यात घेऊन निघाली कॉलरवाली वाघीण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com