
Madan Manjiri Dance Video: सोशल मीडियावर दररोज अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र पुन्हा एका असाच एक भन्नाट डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असताना पाहायला मिळतोय.ज्यात एका चिमुकल्याने मी मदन मंजिरी या प्रसिद्ध गाण्यावर एनर्जीने डान्स केलेला आहे.डान्स पाहिल्यानंतर अक्षकश: सर्वजण घायाळ झालेले आहे.
व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक मुलगा दिसत आहे.ज्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे.काही वेळानंतर तरुण मदन मंजिरी गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतो.व्हिडिओत चिमुकला अत्यंत उत्साहासाने आणि हटके स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.त्याचे एक आणि एक एक्सप्रेशन्स आणि अचूक स्टेप्स पाहून नेटकरही वेडे झालेले आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे .
डान्स व्हिडिओ 'vihaan_24014' या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हजारो लाईक्स व्हिडिओला दिलेले आहेत आणि लाखोंच्या घरात व्ह्यूजही व्हिडिओला मिळालेले आहे.ऐवढेच नाही तर चिमुकल्याच्या डान्स व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''प्राजक्तालाही मागे टाकलं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जबरदस्त'' तर अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया डान्स व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.
टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.