
Elephant Dancing Bharatnatyam: जंगलातील सर्वात बलवान प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हत्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हत्तीला तुम्ही कधी डान्स करताना पाहिलंय का? नसेलच पाहिलं.
कारण प्राणी गाण्याच्या तालावर डान्स करुच शकत नाही. त्यात हत्ती म्हटलं, तर मुळीच नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्ती चक्क भरतनाट्यम डान्स करताना दिसतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? जाणून घ्या.
सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता @sankii_memer या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ९ लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार, दोन मुली भरतनाट्यम डान्स करताना दिसून येत आहेत.
त्यांच्या मागे हत्ती असल्याचं दिसून येत आहे. या मुलींना डान्स करताना पाहून हत्ती देखील तालावर मान हलवताना दिसून येत आहे. अवघ्या १५ सेकंदांच्या या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच, हत्ती डान्स करतोय हे पाहून अनेकांना आनंद झाला. पण काहींनी यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय वनसेवा अधिकाऱ्यांनी दावा केलाय की, तो हत्ती तणावात आहे. आयएएस सुप्रिया साहु यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'हत्ती डान्स करत नाहीये, तो तनावात आहे. जेव्हा हत्ती तनावात असतात तेव्हा ते अशी हालचाल करतात.'
आयएफएस परवीन कासवान यांनी देखील व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्यांनी लिहिले, ' मी काही महिन्यांपूर्वी या मादा हत्तीची व्हिडिओग्राफी केली होती. तिने बछड्याला जन्म दिला. आम्ही तिथे असल्यामुळे ती तनावात होती. या व्हिडिओमध्येही ती तसंच हालचाल करत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.