Viral Video: जत्रेतील राईडमध्ये बसण्यासाठी मागणी, श्वानाचा हट्ट आणि मालकिणीचा प्रेमळ प्रतिसाद, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On fair: मॉल किंवा रिसॉर्ट्समध्ये ज्या खेळ आणि राईड्स मुलांसाठी असतात, तिथे श्वानाने असा हट्ट केल्यामुळे ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

आता सोशल मीडियावर एक अनोखी आणि मजेदार घटना व्हायरल होत आहे, जिथे एक श्वान एका गेम झोनमध्ये राईडवर बसण्यासाठी हट्ट करत आहे. ज्या प्रकारे लहान मुले खेळण्यासाठी गेम झोनमध्ये तासंतास खेळतात, त्याच प्रकारे हा श्वान राईडवर बसण्यासाठी हट्ट करत आहे. सामान्यत: मुलांसाठी डिझाइन केलेल्या या राईड्समध्ये आता एक श्वानही आनंद घेत असल्याचे पाहून लोक हसत आहेत. जत्रा, मॉल किंवा रिसॉर्ट्समध्ये ज्या खेळ आणि राईड्स मुलांसाठी असतात, तिथे श्वानाने असा हट्ट केल्यामुळे ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

सोशल मीडियावर एक व्हायरल होणारा व्हिडीओ एका जत्रेतील (Ghirni Ride) राईडचा आहे. यामध्ये इंजिनच्या छोटे-छोटे डब्बे असलेल्या राईडमध्ये काही लहान मुले मजा करत आहेत. इथे एक श्वान देखील राईडकडे आकर्षित होतो आणि आपल्या मालकिणीकडे राईडमध्ये बसण्यासाठी हट्ट करत आहे. श्वानाच्या हवी-हवी पद्धतीने त्याचा हट्ट दर्शविला जातो. मालकिणीने त्याच्या हट्टाला प्रतिसाद दिला की नाही हे व्हायरल व्हिडीओमधून पाहता येईल. एक अनोखी आणि मजेदार घटना असलेल्या या व्हिडीओमुळे अनेक लोक हसले आहेत आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक श्वान एका जत्रेतील (Ghirni Ride) राईडच्या आजुबाजूला फेरफटका मारताना दिसतो. श्वानाची मालकिणी त्याच्याशी संवाद साधून तिकीट खरेदी करण्यासाठी जाते. राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाच्या हट्टाला मान्यता दिली जाते आणि त्याला इंजिनच्या छोट्या डब्यात बसवले जाते. व्हिडीओमध्ये श्वानाच्या मनात काय चालले आहे, याचे मजेदार हिंदी सबटायटल्स देखील आहेत. या व्हिडीओने लोकांना हसवले आहे आणि सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहे. श्वानाचा आनंद आणि हट्ट लक्षवेधी असून, हे दृश्य खूपच मजेदार आणि आकर्षक आहे.

Viral Video
Viral Video: सापाने काढला फणा, मुंगूसांने १० सेकंदात गेम केला, थरारक झुंजीचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हायरल VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @pawson_dodo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये श्वान डोडो एक जत्रेत राईडचा आनंद घेतो. व्हिडीओला 'श्वानाची उत्सुकता' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत, "राईडमध्ये श्वानाला बसवण्याची परवानगी दिली, हे पाहून छान वाटले." काही युजर्सनी या व्हिडीओला "इन्स्टाग्रामवरील सगळ्यात बेस्ट व्हिडीओ" असं सांगितलं आहे. श्वान डोडोने या जत्रेत इतर राईड्सचाही आनंद घेतल्याचे व्हिडीओवर दिसते, आणि तो सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Viral Video
Hit And Run: मारामारी पाहत उभा होता, भरधाव वेगाने गाडी आली अन्... हिट अँड रन प्रकरणाचा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com