पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात बाहेर कुठेही जाताना अनेक लोक कार किंवा बाईकचा वापर करतात. पावसाळ्यात बाईक अनेकदा बंद पडते. बाईकच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन अनेक समस्या होतात. तसेच बाईक उभी असल्यास त्यात पाणी साचून साचून गंज पकडतो. या परिस्थितीत बाईकची विशेष काळजी घ्यायला हवी. याचसोबत पावसाळ्यात बाईकरुन जाणे अनेकजण टाळतात. पावसाळ्यात बाईकवरुन जाताना माणूस पूर्णपणे भिजतो. रेनकोट किंवा हेल्मेट घातले तरीही माणूस भिजतो. त्यामुळे शक्यतो पावसात बाईक घेऊन जाणे टाळावे. परंतु एका पठ्ठ्याने या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक भन्नाट आयडिया केली आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत एक माणूस बाईक चालवताना दिसत आहे. मात्र, पाऊस पडत असल्याचे तो संपूर्ण भिजतो. परंतु पावसाळ्यात बाईकवरुन जाताना भिजू नये यासाठी बाईकला संपूर्णपणे झाकून टाकले आहे. त्याने बाईकवर हेल्मेटसाठी मोठे कव्हर तयार केले आहे. यामुळे त्याला पावसाच्या पाण्यात भिजावे लागत नाही. या कव्हरने त्या बाईकस्वाराला संपूर्णपणे झाकून घेतले आहे. त्यामुळे तो व्यक्ती एकदम आरामात बाईक चालवताना दिसत आहे. हे कव्हर लावल्याने बाईक पूर्णपणे झाकली आहे. त्यामुळे ही बाईक नव्हे तर कार वाटत आहे. बाईकला टार्जन लूक दिल्यासारखे वाटत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
@PicturesFoIder या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'बाईकस्वारांसाठी अत्यंत उपयोगी गोष्ट तयार केली आहे', 'बाईकचा आता पावसापासून बचाव होणार', अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.