Bike Fire: पेट्रोल भरताना मोबाईल वापरताय? सावधान! मोबाईल पेटवेल तुमची बाईक

आता बातमी वाहनचालकांना सावध करणारी.छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील पेट्रोल पंपावर दुचाकीला अचानक आग लागलीय.नेमकं काय घडलं दुचाकी चालकासोबत आणि यातून तुम्ही देखील का सतर्क व्हायला हवं. पाहा.
Bike Fire:  पेट्रोल भरताना मोबाईल वापरताय? सावधान! मोबाईल पेटवेल तुमची बाईक
Bike Fire
Published On

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावर फोन उचललणं एका दुचाकी चालकाला चांगलंच महागात पडलंय...पेट्रोल पंपावर फोन वापरु नये हा इशारा देण्यात आलेला असतो..तरी त्याकडे दुर्लक्ष करुन अनेकजण फोनचा सर्रास वापर पेट्रोल पंपावर करतात. तुम्ही देखील असं करत असाल तर ही दृष्य पहा.

एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येतो.त्याच वेळी त्याच्या फोनची रिंग वाजते. फोन उचलणार त्याआधीच त्याची दुचाकी पेटते. नीट बघा. ही व्यक्ती फोन पूर्ण उचलतही नाही..तरी दुचाकीनं पेट घेतला. ही घटना तुमच्यासोबतही घडू शकते. त्यामुळे ही दृष्य नीट पहा

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारानं आणि पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लांब नेली. त्यानंतर तातडीने आग आटोक्यात आणली. आता हे ही समजून घ्या की पेट्रोल पंपावर फोनवर का बोलणं टाळावं.

पेट्रोल पंपावर 'नो मोबाईल

मोबाईलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पेट्रोलची वाफ पेट घेते

पेट्रोल पंपापासून 6 मीटर अंतर ठेऊन मोबाईल वापरावा.

Bike Fire:  पेट्रोल भरताना मोबाईल वापरताय? सावधान! मोबाईल पेटवेल तुमची बाईक
अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि आकर्षक लूकसह Yamaha Fascino S लाँच; किंमत १ लाखांपेक्षा कमी

त्यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर टाळाच...नाहीतर संभाजीनगरात घडलेली घटना तुमच्या सोबतही घडू शकते..सावध राहा...सतर्क राहा...पेट्रोल भरताना मोबाईल टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com