अकोल्यात सिनेस्टाईल थरार, डोळ्यात मिरची पूड टाकून पेट्रोल पंप चालकाचे लाखो रुपये लुटले
Akola Murtizapur Crime NewsSaam TV

Akola Crime News : अकोल्यात सिनेस्टाईल थरार, डोळ्यात मिरची पूड टाकून पेट्रोल पंप चालकाचे लाखो रुपये लुटले

Akola Murtizapur Crime News : अकोल्यात तीन अज्ञात दरोडेखोरांना डोळ्यात मिरचीपूड टाकून पेट्रोल पंप चालकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published on

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

डोळ्यात मिरची पावडर फेकत चाकूच्या धाकावर एका पेट्रोल पंप व्यावसायिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आलाय. या व्यावसायिकाकडून 3 लाखांची रोख दरोडेखोरांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर घडली. याप्रकरणी पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी 3 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अकोल्यात सिनेस्टाईल थरार, डोळ्यात मिरची पूड टाकून पेट्रोल पंप चालकाचे लाखो रुपये लुटले
Kalyan News: कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सराईत गुन्हेगार गजाआड

गेल्या काही महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात भररस्त्यात अपहरणाच्या आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मूर्तीजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश बूब असे पेट्रोल पंप व्यावसायिकाचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे आपलं काम आटोपल्यानंतर चारचाकी वाहनाने पेट्रोल पंपावरून घराकडे निघाले होते.

वाटेतच त्यांना एका दुचाकीस्वाराने हात दिला आणि त्यांची कार थांबवली. त्यानंतर त्याच्या इतर दोन साथीदारांनी असे एकत्रित तिघांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला चढविला, इतकंच नव्हे तर दिनेश बुब यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांना लाठीने मारहाण केली. त्यानंतर वाहनात ठेवलेली तब्बल अडीच लाखापेक्षा जास्त रोख दरोडेखोरांनी सोबत घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीनं मूर्तीजापूर शहर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, मूर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास भगत याच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झालं.

दरम्यान, या घटनेनंतर भयभीत झालेल्या पेट्रोल पंप व्यावसायिक दिनेश बूब यांना पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरोडेखोर अमरावतीच्या दिशेने पळाले असल्याचं पोलिसांना समजलंय. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे. परिसरातील तसेच रस्त्यावरील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे.

अकोल्यात सिनेस्टाईल थरार, डोळ्यात मिरची पूड टाकून पेट्रोल पंप चालकाचे लाखो रुपये लुटले
Dhule News : धुळ्यात १४ वर्षांच्या मुलासोबत किळवाणं कृत्य! मस्करी करता करता गेला जीव, दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com