Viral Video: कचराच झाला... अंगणातील कचऱ्यामुळे शेजारी भिडले, झाडूने झापुक झुपुक मारलं, व्हिडीओ व्हायरल

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका गमतीदार हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,मात्र याचे कारणही तितके क्षुल्लक आहे.व्हिडिओत पाहून तुम्हाला समजेल याचे कारण तरी काय?
Viral Video News
Viral VideoSaam Tv
Published On

Neighbour Fighting Video: सोशल मीडियावर आजवर तुम्ही नळांवर पाणी भरताना महिलांची अनेक भांडण पाहिली आहेत.अनेकदा या भांडणात महिला चक्क हाणामारीवरही उतरतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला हाणामारीचा व्हिडिओ पाहून तुम्ही डोक्यालाच हात मारला.ज्यात अंगणातील कचऱ्यावरुन पुरुष आणि महिलेमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा नक्की चुक कोणाची आहे ते.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता,एक महिला आणि एक पुरुष त्यांच्या घरातील अंगणातून एकमेंकाशी वाद घालत असतात.मात्र त्यानंतर ती महिला झाडू घेऊन त्या पुरुषाच्या अंगणाच्या दिशेने झाडू मारत कचरा फेकत असते.मग काय तो पुरुषही हातात झाडू घेऊन त्या जागी झाडू मारत तो कचरा महिलेच्या घराच्या दिशेने फेकतो.त्यानंतर दोघही एकमेंकाना हातातील झाडूने मारत असतात,अशी दोघांची हाणामारी शेवटपर्यंत सुरु असताना व्हिडिओत दिसत आहे.

हाणामाराची व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे.मात्र तो व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे,''साफ सफाई करताना महिला आणि पुरुषामध्ये हाणामारी''.व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील काही यूजरने लिहिले आहे की,''काय राव कशासाठीही हाणामारी करतात''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''या लोकांनी स्वच्छ भारत अभियान खुप गंभीररित्या घेतल आहे''अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video News
Viral Video: रस्त्याच्या मधोमध साप-मुंगूसची झुंज, वाहतूक कोंडी आणि लोकांची गर्दी, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com