Dance Viral Video: लग्नमंडपात नणंद आणि भावजयीमध्ये झाली जुगलबंदी; जबरदस्त डान्स पाहून नेटकरी म्हणाले,वाह क्या बात है,VIDEO VIRAL

Wedding Dance Viral Video: सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ डान्सचे असतात.सोशल मीडियावर असाच एक नणंद-भावजयीचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Dance Viral Video
Dance Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ हे लग्नातील असतात. लग्नातील संगीताचे, डान्सचे, नवरा- नवरीच्या एन्ट्रीचे तर अनेकदा भांडणाचे व्हिडिओदेखील असतात. यातील काही व्हिडिओमध्ये नवरीचा एन्ट्रीला डान्स असतो. तर नवरीच्या किंवा नवऱ्याचे कुटुंबिय एन्ट्रीला डान्स करतात. असाच एक नणंद भावजयींचा लग्नातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नातल डान्स करण्याचा सध्या ट्रेंड सुरु आहे. अनेक लोक त्यांच्या त्यांच्या स्टाईलने डान्स करतात. असाच एक नणंद भावजयींच्या हरियाणी गाण्यावरील नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत लग्नसोहळा सुरु असल्याचे दिसत आहे. लग्नाच्या कार्यक्रमात अनेक पाहुणे, नवरा-नवरी दिसत आहे. व्हिडिओत नवरा- नवरीच्या एन्ट्रीला नवऱ्याच्या बहिणी म्हणजेच नवरीच्या ३ नणंद डान्स करायला सुरुवात करतात. या तिघीही उत्तम डान्स करतात. त्यानंतर त्या नवरीलादेखील डान्स करायला सांगतात.

तीन नणंद आणि त्यांची वहिनी अशी डान्सची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यानंतर आजूबाजूच्या लोकांनादेखील डान्स करण्याचा मोह आवडत नाही. यानंतर सर्वजण नाचू लागतात. नवरीचा उत्तम डान्स पाहून सर्वजण आश्चर्याने पाहतच बसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Dance Viral Video
Viral Stunt Video: बापरे! धावत्या कारवर बसून मद्यपान; तरुणाच्या जीवघेणी स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

Dancing Superstar या फेसबुक अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकटी वहिनी तीन नणंदावर भारी पडली. वहिनी भारी नाचली, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Dance Viral Video
Fact Check : अयोध्येतील राम मंदिरामुळे लोकसभेत पराभव? शिर्डीच्या माजी खासदारांच्या VIRAL व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com