Fight Over Raksha Bandhan: रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी झाल्या नाराज; गिफ्ट न मिळाल्यानं वहिनीलाच धू धू धुतलं...!

Sister In Laws Beat Bhabhi: मागितलेलं गिफ्ट न मिळाल्याने तीन नंदांनी आपल्या भावाच्या पत्नीला चांगलीच शिक्षा दिलीये.
Fight Over Raksha Bandhan
Fight Over Raksha BandhanSaam TV
Published On

Delhi Crime News:

रक्षाबंधन (Raksha Bandana) म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट सोहळा. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाचे औक्षण करत त्याला राखी बांधते आणि भाऊ बहिणाला तिच्या रक्षणाचे वचन देतो. या दिवशी भाऊ बहिणीला सुंदर अशी भेटवस्तू, गिफ्ट देखील देतो. आता या गिफ्टवरुन दिल्लीत मोठा राडा झाला आहे. मागितलेलं गिफ्ट न मिळाल्याने तीन नंदांनी आपल्या भावाच्या पत्नीला चांगलीच शिक्षा दिलीये. (Lates Raksha Bandhan News)

नेमकं काय घडलं?

सदर घटना दिल्लीच्या मैदानगढी परिसरात घडली आहे. येथे नर्सिंगचे काम करणारी महिला आपल्या पतीसोबत राहते. रक्षाबंधनच्या दिवशी तिच्या तिन्ही नंदा घरी आल्या होत्या. बहिणी घरी आल्या म्हणून भाऊ फार आनंदी होता. घरी गोडाधोडाचं जेवण बनवण्यात आलं. राखी बांधताना भावा बहिणीत काही कारणावरुन वाद झाला.

Fight Over Raksha Bandhan
Raksha Bandhan 2023 : आता राखीनंतर मेहंदीवर QR Code; भावाकडून गिफ्ट मिळवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

बहिणींनी मागितलं मोठं गिफ्ट

पुढे बहिणींनी भावाला राखी बांधली आणि ओवाळणीत २१ हजार रुपये मागितले. प्रत्येकीला २१ हजार रुपये देण्याइतका भावाचा खिसा भरलेला नव्हाता. आपल्या पतीची परिस्थिती पत्नीला पाहवली नाही. भावा-बहिणीच्या संवादात ती मध्ये पडली. याचा बहिणींना फार राग आला. त्यांनी संपूर्ण राग वहिनीवर काढला. पैसे न दिल्याने या नंदांनी आपल्या वहिनीला बेदम मारहाण केली.

आपल्या नंदा मारहाण करत असल्याने वहिनीने पोलिसांना फोन लावला. मात्र पोलिसांशी काही बोलण्याआधीच घरातील इतर सदस्स्यांनी तिला मारहाण केली. मारहाणीत पीडितेची तब्येत इतरी बिघडलीकी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. नंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

Fight Over Raksha Bandhan
Raksha Bandhan Special Recipe : रक्षाबंधनच्या दिवशी अशी बनवा बेसनापासून ही रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com