Viral Video: आजीबाईंचा नाद नका करु... पोरांना बाजूला केलं अन् तळ्यामध्ये सूर मारला, स्वॅग पाहून नेटकरी म्हणाले...

Older women Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत आजींचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळाला आहे.
Older women Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

आजी म्हणजे नातंवडांचा घरातील हक्काचा आणि आवडीचा सदस्य. प्रत्येक हट्ट आपल्या आजीकडे पूर्ण करता येतात. सोशल मीडियावर अनेक आजीच्या नात्यांचा उलगडा दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कधी आजींचा डान्स व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर कधी आजींचा गंमतीदार व्हिडिओ व्हायरल झालेला आगे. मात्र सध्या व्हायरल झालेला व्हिडिओत आजी थेट पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या आहेत. सध्या आजींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र नेटकऱ्यांच्या का पसंतीस आलेला आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहूनच समजेल.

आपल्यापैंकी प्रत्येक व्यक्तीकडे अनेक कला आहे. कोणचा स्वयंपाक (Food) करण्यात अव्वल असेल तर कोण एखाद्या खेळात. मात्र वयानुसार व्यक्तीमधील ऊर्जा आणी शक्ती कमी होण्यास सुरुवात होते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील आजीने हे मत अगदी चूकीचे ठरवले आहे. व्हायरल (Viral) व्हिडिओतील आजी थेट पोहण्यासाठी शेततळ्यात उतरल्या आहेत.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ संपूर्ण परिसर शेतशिवाराती दिसून येत आहे. जिथे एक विहिरीसारखे शेततळ आहे. मात्र तुम्ही व्हिडिओ पाहिला असता तर ते शेततळ मोठ्या प्रमाणात पसरलेले आणि खोल दिसून येत आहे. यात एक तिथे आजी येतात. या आजींनी हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. मात्र काही वेळात आजी (Old Women) त्या पाण्यात उतरुन स्विमिंग करण्याचा आनंद लुटतात. संपूर्ण व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तींने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''marathi_reels_90''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे. जवळपास व्हिडिओला २ लाखाहून अधिक लोकांनी पसंत केलेला आहे तर अजूनही व्हिडिओला व्ह्यूज (Views) मिळत आहे.

प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. त्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया कमेंटबॉक्ममध्ये दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्संनी लिहिले आहे की,''कडक'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''मानलं आजीला'' तर बाकी यूजर्संनी आजींच्या या उत्साहाचे कौतुक (Curiosity) केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Older women Viral Video
Viral Video: क्या फॅन बनेगा रे तू... Babar Azamला भेटायला चाहता मैदानात घुसला,पण पुढे भलतंच घडलं- VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com