Viral Video News
Viral VideoSaam Tv

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Viral Video News: सध्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तरुणीने आपल्या प्रियकराला घरच्यापासून लपवण्यासाठी अनोखी शक्कल लावलेली आहे.
Published on

Shocking Viral Video: तरुण वयात तरुण- तरुणी घरच्यांपासून लपवून डेटिंग करत असतात. मग काय घरच्यांना समजताच त्यांच्या प्रेमप्रकरणामध्ये अनेक अडथळे येण्यास निर्माण होतात. मग घरच्यांपासून लपून भेटणे सुरु होते तर कधी कुटुंबिय घरी नसताना प्रियकराला घरी बोलावणे. मात्र प्रियकरला घरी बोलावल्यानंतर अचानक कोणीतरी येत आणि पकडले जातो. असाच काही प्रसंग तरुणीसोबत घडला आहे, ज्यात प्रियकराला घरी बोलावल्यानंतर अचानक घरातील मंडळी येतात मग तरुणीने प्रियकराला कुठे लपवले आहे जे पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

व्हायरल(Viral) व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक घराच्या आतील खोली दिसत आहे. खोली अत्यंत साधी आहे जिथे विटांचे बांधकाम आहे. व्हायरल व्हिडिओत पुढे दिसते की एक तरुणी आहे जी घरात असलेल्या काही सदस्यांसोबत वाद घालताना दिसत आहे. मात्र व्हिडिओत पाहिले तर तरुणीच्या पाठीमागे एक लहानशी पेटी आहे, जी बंद आहे. वाद सुरु असताना खोलीतील सदस्य तरुणीला ती पेटी खोलण्यास सांगतात. त्यानंतर तरुणी जशी पेटीचे कुलूप खोलते, त्या बंद पेटीतून एक तरुण बाहेर लपलेला असतो. व्हिडिओला(Video),''गर्लफ्रेंडने प्रियकराला एका बॉक्समध्ये बंद केले'' अशा दिलेल्या कॅप्शनमधून समजते की तरुणीने घरच्यापासून लपवण्यासाठी पेटीत प्रियकराला ठेवले होते. मात्र घरचे अचानक आल्यामुळे तरुणीला हा प्रकार करावा लागला.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिआ प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र एक्स अर्थात ट्विटरवरील ''@gharkekalesh'' या पेजवर एका दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ''गर्लफ्रेंडने प्रियकराला एका बॉक्समध्ये बंद केले'' असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर व्हिडिओ पाहून काही वेळात लाखोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि अजूनही व्ह्यूज वाढत आहे

प्रेयसीचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकरी चक्रावून गेलेला आहे. त्यानंतर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''प्रेमात पडल्यानंतर काय करावे लागते?'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हेच बाकी होत आता'' तर अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video News
Viral Video: आखाड्यातला मित्र पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात भेटतो तेव्हा, मंत्री मुरलीधर मोहोळ भारावले, काळजाला भिडणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com