Viral Video: पठ्ठ्याने स्टेजवर केली एसटी बसची अनाउन्समेंट, तुम्ही आवाज ऐकलात? VIDEO पहताच नेटकरी म्हणाले...

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका शाळेतील विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने शाळेत भरलेल्या साहित्य संमेलनात एक उत्तम कला सादर केली आहे. जी प्रत्येकाच्या पसंतीस आली.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

School Boy Video: सोशल मीडियावर आपल्याला शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मग कधी विद्यार्थ्यांचा कधी डान्स असतो तर कधी विद्यार्थ्यांमध्ये असलेले कला-गुण आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशात एका अवलियाचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे, ज्यात शाळेतील विद्यार्थ्यांने एसटी महामंडळामध्ये बस येण्यावेळी जी अनाउन्समेंट होते, त्यासारखा महिलेचा आवाज काढलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शाळेतील साहित्या संमेलन सुरु असलेले दिसते. या संमेलनात एक शाळेतील विद्यार्थी स्टेजवर येतो आणि सर्वांच्या समोर उभे राहून, ज्या वेळेस एसटी बस स्टॉपवर येणार असते, जेव्हा ती अनाउन्समेंट महिला करते,त्या सारखा हुबेहुब आवाज या विद्यार्थ्यांने काढला आहे. विद्यार्थ्याचे है कौशल्य पाहून तिथे असलेला संपूर्ण प्रेक्षक वर्ग त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतो. प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे.

विद्यार्थ्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ ''marathi_epic_jokes'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठला आहे आणि त्या विद्यार्थ्याचे नाव काय आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि मोठ्या संख्येने नेटकऱ्यांचे व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांचा व्हिडिओ पाहून व्हिडिओच्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी हटके प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भावाला 21 तोफाचीं सलामी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भाऊला एस टी महामंडळाचे अध्यक्ष करा'' तर,''सदर विद्यार्थ्याचं कौशल्य पाहून लाडक्या बहिणीची पेमेंट लागू करावी'', अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Viral Video: सापाशी मस्ती करणं आलं अंगलट, त्याच्या खेळ त्याच्यावरच उलटला; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com