Stunt Video: कारच्या टपावर चढून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; VIDEO व्हायरल; पोलिसांची वायुवेगानं कारवाई

Stunt Viral Video: सोशल मीडियावर तरुण पिढी अनेकदा स्टंट करताना दिसते. अनेकदा बाईकवर तर कधी कारवर चढून वेगवेगळ्या रिल्स बनवताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक कारचालक धावत्या कारवर स्टंट करताना दिसत आहे. धावत्या कारवर चढून कारचालक चालताना दिसत आहे.
Stunt Video
Stunt VideoSaam Tv

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकजण स्टंटबाजी करताना दिसतात. बाईकवरुन जाताना वेगवेगळे स्टंट करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा तर प्रेमवीर बाईकवरुन जाताना अश्लील कृत्य करताना दिसतात. अनेकदा दोन्ही हात सोडून बाईक चालवतानाचेदेखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका कारचालकाचा स्टंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक कारचालक चालत्या कारमधून बाहेर येऊन चक्क कारच्या टपावर उभा असलेला दिसत आहे. चालत्या कारमधून कारचालक बाहेर येतो आणि टपावर चढतो आणि कारवर चालताना दिसत आहे. ती कार तशीच पुढे चालताना दिसत आहे. धावत्या कारमधून बाहेर येऊन हा असा स्टंट करणे जीवावर बेतू शकतो. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

@Siya1708200 या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ राजस्थानमधील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लगेचच मुंबई पोलिस आणि झालावाड पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Stunt Video
Viral Video: हाय गर्मी ! भाई एकदम जोमात, थेट गोठ्यात लावला AC; VIDEO व्हायरल

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'हे स्टंट करणे जीवावर बेतू शकते'. 'स्टंटबाजी करताना कुठे करावी याचा तरी विचार करावा', 'या व्यक्तींमुळे अपघाताची संख्या वाढत आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Stunt Video
Ricky Pond Viral Video: गुलाबी साडीची भुरळ आता परदेशातही; इन्फ्लूएन्सर रिकी पाँडने केला जबरदस्त डान्स; VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com