चोराने तलावात पाण्याखाली लपण्याचा प्रयत्न केला
कमळाच्या देठातून श्वास घेण्याचा भन्नाट डाव
पोलिसांनी ५ तास शोधमोहीम राबवली
अखेर आरोपीला अटक करण्यात यश
चोरी केल्यानंतर किंवा एखादा गुन्हा केल्यावर आरोपी पकडल्या जाण्याच्या भीतीने घटनास्थळावरुन पळ काढतात. पकडले जाऊ नये यासाठी गुन्हेगार लपण्याच्या जागा शोधतात. काही जण देश सोडून जातात, काही जण एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतात. मात्र एका गुन्हेगाराने स्वतःला कमळाच्या तळ्यात लपण्याची जागा शोधली आणि तिथे लपून बसला. धक्कादायक म्हणजे तळ्यात राहून श्वास घेण्यासाठी कमळाचा देठ तोंडात ठेवून त्याद्वारे श्वास घेत होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ हा मध्य प्रदेशातील आहे. आरोपी महिला रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून चोऱ्या करत होता. विशेषतः एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करत असे. आरपीएफ जवान बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत होते. त्यानंतर आरपीएफ जवानांना या चोराचा ठावठिकाणा समजला. या माहितीच्या आधारे नियोजित ठिकाणी सापळा रचून जवानांनी संपूर्ण परिसर सील केला. याची खबर मिळताच आरोपी पळून गेला. तो रेल्वे रुळांच्या दिशेने धावला आणि स्वतःला वाचवण्यासाठी जवळच्या तलावात उडी मारली. आरपीएफच्या जवानांनी तलावापर्यंत त्याचा पाठलाग केला, पण अंधारामुळे आरोपी पाण्यात कुठेही दिसला नाही.
बराच वेळ शोध घेऊनही आरोपीचा काहीच थांगपत्ता न लागल्याने शोध पथकाला बोलावण्यात आले. त्यानंतर तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली. ही शोधमोहीम सुमारे पाच तास चालली. याच दरम्यान एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. आरोपी तलावातील कमळाच्या फुलाची पोकळ देठ वापरत होता. तो या देठाच्या मदतीने पाण्याखाली श्वास घेत होता.
५ तासांच्या प्रतीक्षेनंतर आरोपीला अखेर तलावातून बाहेर काढण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने आपण उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य केल्याची कबुलीही दिली. तसेच त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.